गोव्यात जलसफरी करणाऱ्या बोटी, पॅराग्लायडिंग कधी सुरु होणार? : पर्यटक प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:45 PM2020-09-08T21:45:49+5:302020-09-08T21:47:03+5:30

व्यावसायिकांसमोर चिंता : पर्यटन हंगाम मुकणार तर नाही ना?

When will paragliding start in Goa? : Tourists waiting | गोव्यात जलसफरी करणाऱ्या बोटी, पॅराग्लायडिंग कधी सुरु होणार? : पर्यटक प्रतीक्षेत

गोव्यात जलसफरी करणाऱ्या बोटी, पॅराग्लायडिंग कधी सुरु होणार? : पर्यटक प्रतीक्षेत

Next

पणजी : जलसफरी घडविणाºया बोटी तसेच किनाऱ्यांवर पर्यटकांचे खास आकर्षण असलेले पॅराग्लायडिंग तसेच अन्य साहसी जलक्रीडा कधी सुरु होणार याकडे आता पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मांडवी नदीत लॉकडाउनपूर्वी सांतामोनिका जेटीवर १७ बोटी पर्यटकांसाठी जलसफरी घडवून आणत होत्या. या बोटी गेले सहा महिने बंदच आहेत आणि त्यामुळे ही जेटी वैराण बनली आहे त्याचबरोबर  व्यावसायिकांचेही उत्पन्नाचे साधन बुडाले आहे.

पर्यटन विकास महामंडळाने २५ वर्षांपूर्वी सांतामोनिका जेटी बांधली. मांडवी नदीच्या पात्रात कांपाल येथे दर्यासंगमापर्यंत या बोटी पर्यटकांना जलसफरी घडवून आणत असत. यापैकी काही बोटींना २५ वर्षे झालेली आहेत. सांतामोनिका ही बोट सरकारी मालकीची आहे. अन्य बोटींपैकी ‘पॅराडाइस’ या बोटीची क्षमता १५६, ‘पॅराडाइस- २’ या बोटीची क्षमता ४२0, ‘एमेराल्द क्वीन’ या बोटीची क्षमता १६२, ‘स्वस्तिक’ या बोटीची क्षमता ४१0 आणि ‘कॅरोलक्वीन’ या बोटीची क्षमता ३00 आहे. जलसफरींसाठी एरव्ही पर्यटकांची नेहमीच गर्दी असायची. या बोटींवर अन्नपदार्थ तसेच मद्यही पुरविले जाते. पावसाळ्यात सांजावनिमित्त सरकारी बोटीवर पर्यटन विकास महामंडळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यंदा पावसाळ्यात कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रमही होऊ शकला नाही.

जलसफरी घडवून आणणाऱ्या या बोटी सुरु केल्या तरी शारीरिक अंतर, मास्क परिधान करणे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागेल तसेच बोटींवर क्षमतेपेक्षा बरेच कमी पर्यटक घ्यावे लागतील. याचे कारण बोटींवर गर्दी करुन उपयोगी नाही. बोट सफरींसंदर्भात केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वें जाहीर होईपर्यंत काहीच करता येणार नाही.
 

Web Title: When will paragliding start in Goa? : Tourists waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.