पुर्वीच्या ग्रामसभेत घेतलेले ठराव का बदलता? साकोर्डा ग्रामसभेत ग्रामस्थांचा सवाल

By आप्पा बुवा | Published: June 4, 2023 05:50 PM2023-06-04T17:50:17+5:302023-06-04T17:50:34+5:30

ग्रामसभा सुरू होताच सुरुवातीलाच करवाढ संदर्भात प्रस्ताव आला. विविध क्षेत्रातील कचरा शुल्क आकारण्यास ग्रामस्थांनी आपला सुरुवातीला विरोध दर्शवला.

Why change the resolution taken in the previous Gram Sabha? Villagers' question in Sakorda Gram Sabha | पुर्वीच्या ग्रामसभेत घेतलेले ठराव का बदलता? साकोर्डा ग्रामसभेत ग्रामस्थांचा सवाल

पुर्वीच्या ग्रामसभेत घेतलेले ठराव का बदलता? साकोर्डा ग्रामसभेत ग्रामस्थांचा सवाल

googlenewsNext

फोंडा : ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकदा घेतलेले ठराव दुसऱ्या ग्रामसभेत बदलून कसली परंपरा सुरू करता असा सवाल करत साकोर्डा ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला चांगलेच धारेवर धरले. सरपंच प्रिया खांडेपारकर यांच्या उपस्थितीत सदरची ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी उपसरपंच शिरिश देसाई, पंच सदस्य संजना नार्वेकर, गायत्री मापारी, महादेव शेटकर, नितीन कालेकर, सोनू गावकर हे पंच सदस्य उपस्थित होते .

ग्रामसभा सुरू होताच सुरुवातीलाच करवाढ संदर्भात प्रस्ताव आला. विविध क्षेत्रातील कचरा शुल्क आकारण्यास ग्रामस्थांनी आपला सुरुवातीला विरोध दर्शवला. शेतकरी व बागायतदार त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या फार्म मध्ये किंवा शेतात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ते खत म्हणून विल्हेवाट लावतात. तेव्हा अशा कचऱ्यावर कर का लावावा असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी काही गोष्टी अमान्य करून,करवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

साकोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या काही निम्न शासकीय संस्था लोकप्रतिनिधींना डावलून कार्यक्रम करत होते. यासंबंधी मागच्या ग्रामसभेत ताशेरे ओढण्यात आले होते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना डावलणाऱ्या संस्थांना असहकार्य करण्याचा ठराव घेण्यात आला होता. रविवारच्या ग्रामसभेत मात्र सदरचा  ठरावावर पुनर्विचार व्हावा अशी बाब पुढे येताच ग्रामस्थांनी त्यांना तीव्र विरोध केला.  ग्रामपंचायतीचे सचिव भूषण तावडे यांचा हल्लीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. महादेव शेटकर यांनी सुद्धा पंचायत सचिवांचे यावेळी खास अभिनंदन केले.

साकोर्डे ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या प्रसिद्धी बद्दल एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ग्रामसभा सुरू होण्याअगोदर  गाडीवर लाऊड स्पीकर लावून तो संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात येतो.  सदरच्या कृतीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. सदाशिव कामत, संतोष साकोर्डेकर, निलेश आगळोटकर, सदा आगळोटकर, कमलाकर देसाई, राजेंद्र देसाई, उल्हास देसाई आदी ग्रामस्थांनी यावेळी चर्चेत भाग घेतला होता.

Web Title: Why change the resolution taken in the previous Gram Sabha? Villagers' question in Sakorda Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा