कामतांच्या अटकेपूर्वीच केस डायरी कशाला?
By admin | Published: September 11, 2015 02:04 AM2015-09-11T02:04:07+5:302015-09-11T02:04:19+5:30
पणजी : जैका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी विशेष न्यायालयाने जे केस डायरीचे कारण दिले
पणजी : जैका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी विशेष न्यायालयाने जे केस डायरीचे कारण दिले होते, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा करताना उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सरकारी वकील संतोष रिवणकर यांनी अटक करण्यापूर्वी केस डायरीचा मुद्दा उपस्थितच कसा होतो, असा प्रश्न केला. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी सुनावणी पुढे चालू राहणार आहे.
सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत अटक करण्यासाठी केस डायरीत कारण नमूद करावे लागते. दिगंबर कामत यांना अटक करण्याचे कारण केस डायरीत नमूद न करण्यात आल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आल्याचे विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले होते; परंतु हा आदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट करताना अॅड. रिवणकर यांनी कलम ४१ हे अटक केल्यानंतर लागू होत असल्याचे सांगितले. कामत यांना अटकच करण्यात आली नाही. त्यामुळे केस डायरीतील नोंदीची आवश्यकता भासली नाही, असे त्यांनी न्या. के. एल. वदाने यांच्या निदर्शनास आणून दिले.
कामत हे मोकळे राहिल्यास तपास कामात कसे अडथळे येऊ शकतात, हे त्यांनीच (पान २ वर)
क्राईम ब्रँचचा दावा : विशेष न्यायालयाचा आदेश चुकीचा