बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? पोलिस काय करतात?: रोहन खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:06 AM2023-03-25T09:06:13+5:302023-03-25T09:07:13+5:30

सर्व बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? तेथील पोलिस निरीक्षक काय करतोय? असा संतप्त सवाल करीन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला.

why illegal things only in calangute what do police do asked rohan khaunte | बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? पोलिस काय करतात?: रोहन खंवटे

बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? पोलिस काय करतात?: रोहन खंवटे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सर्व बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? तेथील पोलिस निरीक्षक काय करतोय? असा संतप्त सवाल करीन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला. टुरिस्ट गाइड, पर्यटकांना लुटणारे वॉटर स्पोट्र्सवाले या कोणाचीही गय करणार नाही, असा सक्त इशारा दिला. 

खंवटे म्हणाले की, बांधकामे किनाऱ्यापर्यंत नेली आहेत. वेश्या व्यवसाय तसेच अन्य गैर गोष्टी किनारपट्टीत घडताहेत त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. गोव्याला पर्यटनाच्या बाबतीत शेजारी सिंधुदुर्गातील मालवण तसेच इतर पर्यटनस्थळांशी स्पर्धा करावी लागेल.

मोपा सुरु झाल्यानंतर पर्यटन क्षेत्रात आणखी पायाभूत सुविधांची गरज निर्माण झालेली आहे. आम्हाला किनारे स्वच्छ ठेवावे लागतील. गुंतवणूक आणावी लागेल तसेच आगामी २० वर्षांचा पर्यटन आराखडा तयार करावा लागेल. वेलनेस, साहसी पर्यटन, इको टुरिझम आणावे लागेल, असेरी खंत म्हणाले

लूट थांबवा

किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टसवाले पर्यटकांना लुटतात त्यावर खंवटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, पॅरासेलिंगसाठी ८०० रुपयांऐवजी ३ हजार रुपये आकारून लूट केली जात आहे.

गोमंतकीय व्यावसायिकांवर अन्याय करणार नाही

खवटे म्हणाले की, स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी किनारपट्टीतील काही गोष्टी जागेवर घालण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले होते; परंतु ते आता स्थानिक व्यावसायिकांची कड घेऊन बोलत आहेत. सरकार कोणाही गोमंतकीय व्यावसायिकावर अन्याय करणार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: why illegal things only in calangute what do police do asked rohan khaunte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा