पोलीस कायदा अद्याप का नाही?
By admin | Published: July 29, 2016 02:08 AM2016-07-29T02:08:36+5:302016-07-29T02:12:20+5:30
पणजी : सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्येच ड्रग्सचे व्यवहार बिनबोभाट चालू आहेत. या मतदारसंघामध्येच हे व्यवहार वाढलेले आहेत,
पणजी : सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्येच ड्रग्सचे व्यवहार बिनबोभाट चालू आहेत. या मतदारसंघामध्येच हे व्यवहार वाढलेले आहेत, असे अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
गुन्हे, भ्रष्टाचार बेसुमार वाढला आहे. सरकारी कार्यालये ज्या ठिकाणी खासगी मालमत्तेत वावरत आहेत, तेथे ‘आॅडिट’ व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार दिगंबर कामत म्हणाले, की ड्रग्स व्यवहार अंतर्गत भागातही पोचला आहे. ६४ गोमंतकीय, १०१ परप्रांतीय व ९८ विदेशी पकडले गेले. चोरीचा छडा लावला जात नाही, हे प्रमाण घसरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कॅसिनोंवर नियंत्रासाठी कोणताही कायदा नाही. काँग्रेसने कॅसिने आणले तरी भाजपने त्याचे उदात्तीकरण केले, अशी टीका केली. आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले, की १९ टक्के गुन्हे घटले. छडा लावण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. सांगे व केपे पोलीस स्थानकांचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. गुन्हेगार शोधण्यासाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर हवा. (प्रतिनिधी)