कार्यकर्त्यांच्या बळावरच पुढची निवडणूक लढविणार : रमेश तवडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 08:16 IST2025-03-21T08:16:04+5:302025-03-21T08:16:22+5:30

श्रीस्थळ येथील सरकारी विश्रांतीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

will contest the next election on the strength of workers said ramesh tawadkar | कार्यकर्त्यांच्या बळावरच पुढची निवडणूक लढविणार : रमेश तवडकर

कार्यकर्त्यांच्या बळावरच पुढची निवडणूक लढविणार : रमेश तवडकर

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : भाजप कार्यकर्त्याच्या बळावर आगामी, २०२७ ची निवडणूक लढविणार आहे. काणकोणचा पुरेपूर विकास व्हावा यादृष्टीने कार्य सुरू आहे. विजेची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण तालुक्याची तहान भागविण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय पातळीवर कार्य सुरू आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

श्रीस्थळ येथील सरकारी विश्रांतीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काणकोण भाजपा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, मावळते अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, दक्षिण गोवा भाजपचे उपाध्यक्ष महेश नाईक उपस्थित होते. आधीच्या मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई यांनी चांगली कामगिरी केली. तशीच कामगिरी प्रभाकर गावकरसुद्धा करतील, असा विश्वास तवडकर यांनी व्यक्त केला व नव्या समितीला शुभेच्छा दिल्या.

काणकोण भाजप मंडळाची नवीन समिती जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्ष- शाबा नाईक गावकर, विंदा सतरकर, चंद्रकांत सुदीर, सरचिटणीस दिवाकर पागी, संजीव तिळवे, सचिव अशोक कुष्टा गावकर, अंजली गावकर, तन्वी कोमरपंत, खजिनदार- कुशवंत भगत, सदस्य गणेश गावकर, विनय तुबकी, किशोर शेट, रजनिश कोमरपंत, रमाकांत नाईक गावकर, विकास प्रभू, लक्ष्मण पागी, जयेंद्र गावकर, कुशाली महाले, रूपा पागी, आनंदू देसाई, सिद्धार्थ देसाई, रुपा म्हाळगो गावकर, सुप्रिया प्रेमानंद गावकर, आरती काणकोणकर, सुनील पैंगणकर, स्टीव्हन रॉड्रिग्स, निशा च्यारी, अजित लोलयेकर, अमिता पागी, रोशनी पागी यांचा समावेश आहे. यावेळी प्रभाकर गावकर, दिवाकर पागी यांनी मनोगत व्यक्त केले. महेश नाईक यांनी आभार मानले.
 

Web Title: will contest the next election on the strength of workers said ramesh tawadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.