आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

By किशोर कुबल | Published: November 21, 2023 01:48 PM2023-11-21T13:48:20+5:302023-11-21T13:48:39+5:30

सुर्ला येथे धाडसी क्रियाकलापांचा अनुभव पर्यटक घेऊ शकतील.

Will develop 12 more eco camps! Important decisions in the State Wildlife Board meeting | आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पणजी : सुर्ला व कुळे येथे इको टुरिझम विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावांवर राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. वन विकास महामंडळ आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार आहे.पर्यटकांसाठी निसर्ग पदभ्रमण, धबधब्यांवर व्हयु पॉइंट विकसित करणे, पक्षी निरीक्षण, खाद्य सुविधा उपलब्ध  केल्या जातील. सुर्ला येथे धाडसी क्रियाकलापांचा अनुभव पर्यटक घेऊ शकतील.

बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वनमंत्री विश्वजित राणे, वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार दिव्या राणे व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना वनमंत्र्यांनी असे सांगितले कि,‘ बोंडला अभयारण्यात सहली, नेत्रावळी अभयारण्यात सफरींसाठी जीपगाड्या उपलब्ध करणे, दुधसागरवर पर्यावरणाभिमुख सेवा उपलब्ध करणे यावर चर्चा झाली.’

विश्वजित म्हणाले की,‘ ग्रामीण भागांमध्ये सहलींचे आयोजन करुन पर्यटकांना अंतर्गत भागातही नेले जाईल. राज्याच्या अंतर्गत भागात नव्याने विकसित केल्या जाणार असलेल्या पयर्टन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले जातील. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग केला जाईल.

Web Title: Will develop 12 more eco camps! Important decisions in the State Wildlife Board meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा