महिला सशक्तीकरणासाठी महिला फेडरेशनची स्थापना करणार, प्रधान मंत्र्यांचे व्हीजन पुढे नेणार : मंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:00 PM2023-11-13T15:00:41+5:302023-11-13T15:00:41+5:30
गोव्यातील महिला स्वत:च्या बळावर विविध उपक्रम राबवित आहेत. त्यांचे व्हॉकल फोर लाेकलमध्ये मोठे याेगदान आहे.
- नारायण गावस
पणजी: प्रधान मंत्री नरेंद्र माेदी यांचे व्हीजन असलेले व्होकल फोर लाेकल मध्ये गोव्यातील महिलांचे कार्य माेठे आहे. प्रधान मंत्र्यांची विचारधारा पुढे नेत महिलांना आणखी बळकटी देण्यासाठी महिला फेडरेशनची स्थापन केली जाणार आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. दिवाळी निमित्त सेल्फ हेल्फ महिला मंडळांनी केलेल्या खाद्य पदार्थांच्या प्रदर्शन कार्यक्रमात ते बाेलत होते.
गोव्यातील महिला स्वत:च्या बळावर विविध उपक्रम राबवित आहेत. त्यांचे व्हॉकल फोर लाेकलमध्ये मोठे याेगदान आहे. त्यांचे हे कार्य प्रधानमंत्र्यापर्यंत पोहचिवणार. त्यांनी तयार केलेेले खाद्य पदार्थ किंवा इतर कुठलेही पारंपरिक पदार्थांना योग्य मार्केट देणे हे सरकारचे कार्य आहे. म्हणून देशभर सध्या व्होकल फाेर लाेकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रधान मंत्र्यांनी जगतिक पातळीवर देशाचे पारंपरिक पदार्थांना मोठीे प्रसिद्धी दिली आहे. महिलांनी बनविलेले हे खाद्य पदार्थ नमो ॲपवर अपलोड केले तर त्यांची जागतिक पातळीवर मागणी वाढू शकते. यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
दिवाळी असाे चतुर्थी गाेव्यातील महिला वेगवेगळे पदार्थ करुन त्याची विक्री करत असतात. आपण आता यापुढे महिलांनी बनविलेले हे पदार्थ राज्यातील माेठ्या तारांकीत हाॅटेलमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी सर्व हाॅटेल मालकांशी चर्चा करणार आहे. महिलांच्या कलेला याेग्य व्यासपीठ देण्याचे काम हे आमचे आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
तालुका पातळीवर जागा उपलब्ध करणार
महिलाकडून विविध पारपंरिक व्यावसाय केले जातात यात खाद्य पदार्थ तसेच इतर पारंपरिक पदार्थ योग्य मार्केट मिळावे तसेच त्यांना यात याेग्य तो मोबदला मिळावा यासाठी सर्व तालुक्यामध्ये या महिलांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या सर्व समस्या महिला बाल कल्याण खात्यामार्फत साेडविल्या जाणार आहे. सरकार महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रमही राबवित आहे, असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.