...तरच काँग्रेसला पाठिंबा देणार; विजय सरदेसाईंनी घातल्या अटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 11:43 AM2024-03-11T11:43:33+5:302024-03-11T11:44:06+5:30

फ्रान्सिस सार्दिन यांना देण्यास विरोध तिकीट आपला कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

will support congress only then conditions imposed by vijai sardesai | ...तरच काँग्रेसला पाठिंबा देणार; विजय सरदेसाईंनी घातल्या अटी

...तरच काँग्रेसला पाठिंबा देणार; विजय सरदेसाईंनी घातल्या अटी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसने जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दिला तरच गोवा फॉरवर्ड पाठिंबा देईल, अन्यथा नाही, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई स्पष्ट यांनी केले. फ्रान्सिस सार्दिन यांना देण्यास विरोध तिकीट आपला कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सरदेसाई म्हणाले की, 'गोवा फॉरवर्ड काँग्रेसबरोबरच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही आमची काँग्रेसकडे युती होती. परंतु, आता काँग्रेसनेही जबाबदारीने निवडून येण्याची क्षमता असलेलाच उमेदवार द्यायला हवा. सार्दिन यांच्या नावाला मी सुरुवातीपासूनच विरोध केलेला आहे आणि माझा त्यांना असलेला विरोध कायम आहे.'

सरदेसाई म्हणाले की, 'काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून शुक्रवारी मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी सर्व गोष्टी मी त्यांच्याकडे बोललेलो आहे. निवडून येण्याची क्षमता असलेला चांगला उमेदवार काँग्रेसला शोधावा लागेल. केवळ लढायचे म्हणून लढून लोकमान्यता नसलेला उमेदवार देणे अयोग्य ठरेल. काँग्रेसने आधी स्वतःच्या पक्षातील स्थिती सुरळीत करावी व त्यांनी चांगला उमेदवार द्यावा.'

ते म्हणाले की, 'ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीच्या वेळी मी दिल्लीला होतो. त्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. मी माझा प्रतिनिधी पाठवला होता. शुक्रवारच्या भेटीत मी सर्व गोष्टी ठाकरे यांच्याकडे स्पष्ट केलेल्या आहेत.' ते म्हणाले की, 'गोवा फॉरवर्डने रिंगणात न उतरण्याचा निर्णय सुरुवातीलाच घेतलेला आहे. कारण निवडणूक लढविण्यासाठी लागणारा पैसा व इतर स्रोत माझ्या पक्षाकडे नाही आणि गोवा फॉरवर्ड प्रादेशिक तत्त्वावरच आहे.'

आमदार सरदेसाई म्हणाले की, 'केवळ काँग्रेसकडूनच उमेदवार देण्याबाबत विलंब झालेला नाही तर भाजपलाही दक्षिणेत महिला उमेदवार सापडत नसल्याने त्या पक्षालाही उमेदवार देता आलेला नाही. भाजपकडे आमदारांचे मोठे संख्याबळ आहे. तसेच, सदस्य संख्याही लक्षणीय असून डबल इंजिन सरकार आहे. असे असतानाही महिला उमेदवार सापडू नये, ही भाजपची शोकांतिका आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गाजावाजा करून महिला उमेदवार देणार असा गाजावाजा केला. परंतु, अजून भाजपला महिला उमेदवार सापडत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही तसे सांगितल्याची माहिती आता पुढे येत आहे. गोव्यात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे तसेच साक्षरतेचे प्रमाणही जास्त आहे. नारीशक्तीच्या गोष्टी केल्या जातात आणि भाजपला महिला उमेदवार सापडू नये यासारखे दुसरे दुर्दैव नाही.'

 

Web Title: will support congress only then conditions imposed by vijai sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.