जिंकून येणे हाच ठरणार लोकसभा उमेदवारीचा निकष; मुख्यमंत्री दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 09:48 AM2024-02-03T09:48:26+5:302024-02-03T09:48:35+5:30
दक्षिण गोवा मतदारसंघ काबीज करा; अमित शहा, नड्डा यांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकसभा तिकिटाविषयी दिल्लीत केंद्रीय मूहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. जिंकून येणे, हाच उमेदवारी देताना प्रमुख निकष असेल हे या चर्येनंतर स्पष्ट झाले आहे.
दक्षिण गौया लोकसभा मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या ६ रोजी त्याच अनुषंगाने मडगाव येथे आयोजित केलेली आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तवा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचेच नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मंत्री दिलीप परुळेकर इच्छुक होते. परंतु त्यांची नावे। मागे पडली आहेत. दक्षिण गोव्यात अॅड, नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, दिगंबर कामत व रमेश तवहकर हे इच्छुक आहेत.
केंद्रीय नेत्तृत्त्वाने उमेदवारांविषयी चर्चा करण्यासाठी पाचारण केल्याने मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनाचे कालचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळीच दिल्ली गाठली.
६ रोजी मोदींच्या हस्ते वन निवासींना सनदांचे वितरण
६ रोजी मडगाव येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते फाही वन निवासींना जमिनींचे हक्क देणाया सनदांचे वितरण केले जाईल. सरकारकडे सुमारे १० हजारांहून अधिक वन निवासींचे सनदा मागणारे अर्ज प्रलंबित आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व अर्ज निकालात काढण्याचे उदिष्ट सरकारने ठेवले आहे.
पंतप्रधानांच्या गोवा भेटीची माहिती....
मुख्यमंत्री सावंत यानी गृहमंत्री शहा यांना पंतप्रधान मोदीं वांच्या गोवा भेटीची माहिती दिली. ६ रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोणते कार्यक्रम होतील हे सांगितले, वननिवासी हल्क कायद्याखाली नागरिकांना सनदा वितरित केल्या जातील वाची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांच्या सभेसाठी मोठी गर्दी जमेल वाची कल्पना दिली, गेल्या आठ-दहा वर्षांत सरकारने गोव्यात कोणती कामे केली याची माहिती पंतप्रधानांना दिली जाईल, असेही शहा यांना सांगण्यात आले.