शैक्षणिक संस्थांना एक्सिस बॅंकेत खाते उघडण्याचा दिलेला आदेश मागे घ्या
By किशोर कुबल | Published: June 30, 2024 03:46 PM2024-06-30T15:46:30+5:302024-06-30T15:47:24+5:30
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची मागणी
पणजी : शैक्षणिक संस्थांना एक्सिस बॅंकेत खाते उघडण्याचा दिलेला आदेश सरकारने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली आहे. युरी म्हणाले की, खाजगी बॅंकांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीयकृत बॅंकांना संपवण्याचा सरकारचा डाव यातून दिसून येतो. शिक्षण खात्याने काढलेले परिपत्रक मुख्यमंत्र्यांनी त्वरित मागे घ्यावे.
गोवा फॉरवर्डनेही या गोष्टीला विरोध केला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की,‘ मुख्यमंत्री गुरुदक्षिणा’ योजनेच्यावेळीही एक्सिस बॅंकेतच खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यावेळी विरोध केल्यानंतर निर्णय स्थगित ठेवण्यात आला. आता पुन्हा शैक्षणिक संस्थांना याच बॅंकेत खाते उघडण्यास सांगितले आहे. हे योग्य नव्हे.’