बसच्या धडकेने मडगावच्या कदंब बसस्थानकावर महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:27 PM2018-12-17T20:27:06+5:302018-12-17T20:27:32+5:30

बांबोळी येथील गोमेकॉत स्टाफ नर्स म्हणून कामाला होती.

The woman was killed in the bus accident at Margao's Kadamb bus station | बसच्या धडकेने मडगावच्या कदंब बसस्थानकावर महिला ठार

बसच्या धडकेने मडगावच्या कदंब बसस्थानकावर महिला ठार

Next

मडगाव : दक्षिण गोव्यातील मुख्य बसस्थानक म्हणून गणले जाणाऱ्या मडगाव येथील कदंब बसस्थानकावर आज दुपारी एका अपघातात खाजगी प्रवासी बसने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. 

रश्मी राजेंद्र केरकर (39) असे मयताचे नाव असून, ती बांबोळी येथील गोमेकॉत स्टाफ नर्स म्हणून कामाला होती. कामावर जाण्यासाठी कदंब बसमध्ये चढताना एका खाजगी प्रवासी बसने तिला जोरदार धडक दिली. या धडकेने ती त्या बसच्या पुढील चाकाखाली सापडली व जागीच मृत झाली. अपघाताच्या या घटनेनंतर संशयित बस चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. या बसचालकाचा शोध चालू असल्याची माहिती फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.

आज सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. भारतीय दंड संहितेच्या 279 व 304 (अ) कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास सुरु आहे. मृतदेह शवचकित्सेसाठी मडगावच्या मोती डोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.
 

Web Title: The woman was killed in the bus accident at Margao's Kadamb bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात