भारत संकल्प यात्रे अंतर्गत महिला सशक्तीकरणावर भर: आमदार जेनिफर मोन्सेरात
By समीर नाईक | Published: December 19, 2023 04:10 PM2023-12-19T16:10:06+5:302023-12-19T16:10:50+5:30
भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा लोकांना जोडणारा उपक्रम आहे.
समीर नाईक,पणजी: भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा लोकांना जोडणारा उपक्रम आहे. महत्वाचे म्हणजे संकल्प यात्रा उपक्रम अंतर्गत महिला सशक्तीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे, असे प्रतिपादन ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी केले.
ताळगाव येथे मंगळवारी आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याहस्ते भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच जानू रोझारिओ, उपसरपंच रेघा पै, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक, पंचायत सचिव गौरीश पेडणेकर व इतर पंच सदस्य उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ताळगाव येथे पुढील काही दिवस संकल्प यात्रे अंतर्गत जागृती करण्यात येणार आहे. तसेच भारत २०४७ पूर्णपणे विकसित देश होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे, असे मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमापूर्वी ताळगाव पंचायततर्फे गोवा मुक्तीदिन निमित्त आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच विकसित भारत अंतर्गत लोकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तीसवाडी गट विकास अधिकारी प्रीतेश शेट्ये उपस्थित होते.