हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 08:18 PM2018-12-25T20:18:41+5:302018-12-25T20:18:48+5:30

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या महिलेने हे प्रकरण आता राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे नेले आहे.

Women of the National Examination, taking objection to Hijab | हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला

Next

पणजी : हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या महिलेने हे प्रकरण आता राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे नेले आहे. सफिना खान सौदागर (२४) या महिलेला गेल्या १८ रोजी झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (नेट) तिने डोक्यावरील हिजाब हटविण्यास नकार दिल्याने परीक्षेला बसू दिले नाही. तिने या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार केली आहे. तक्रारीत ते म्णते की, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य आणि हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा तिने केला आहे. त्या म्हणतात की, ह्यघटनेच्या कलम २५ ते २८ ने धार्मिक रितीरिवाज पाळण्याचे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण परिधान केलेल्या हिजाबला आक्षेप घेणे हा निव्वळ अत्याचार ठरतो.
तक्रारीत तिने असाही दावा केला आहे की, नेटच्या संकेतस्थळावर कोणता वेष परिधान करावा याबाबत कोणतेही नियम नव्हते. शिवाय परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जावर लावलेला आपला फोटोही हिजाबमध्येच होता. आपला अर्ज स्वीकारण्यात आला त्यामुळे परीक्षा केंद्रावर हिजाबला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. आपण याआधीही नेट परीक्षेला बसले होते परंतु त्यावेळी आक्षेप घेतला नाही, आताच का? असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की, परीक्षा घेण्याचे काम खाते करीत नसले तरी हे प्रकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निदर्शनास आणले जाईल.

Web Title: Women of the National Examination, taking objection to Hijab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.