गोवा : गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाचे काम आचासंहितेपूर्वी सुरू होईल : आमदार राजेश फळदेसाई
By समीर नाईक | Published: March 5, 2024 04:40 PM2024-03-05T16:40:17+5:302024-03-05T16:40:30+5:30
राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.
पणजी : कुंभारजुवे मतदारसंघाचा विकास हेच ध्येय घेत मी राजकारणात आलो आहे. याच पार्श्भूमीवर गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येईल. या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.
राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गवंडाळी ओव्हरब्रिज प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. तसेच या सोबत कुंभारजुवा पुलावरून बायपास रोडकडे जाणार्या जोडरस्त्याचे काम देखील सुरू होणार आहे. यापूर्वीच या कामांना मंजुरी मिळाल्याने, आचारसंहितेत देखील याचे काम सुरूच राहणार आहे, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलविले आहे, त्यांच्याच उपस्थितीत ही पायाभरणी व्हावी, अशी विनंती मी त्यांनी केली आहे. त्यांनी यासाठी संमती देखील दिली आहे. पायाभरणी झाल्यानंतर गवंडाळी ओव्हरब्रिज व इतर प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही फळदेसाई यांनी सांगितले आहे.