सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू

By काशिराम म्हांबरे | Published: January 12, 2024 03:37 PM2024-01-12T15:37:26+5:302024-01-12T15:38:16+5:30

गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना काल गुरुवारी उत्तररात्री १२ वाजल्यानंतर घडली.

Worker dies of suffocation in septic tank | सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू

म्हापसा: म्हापसातील एकतानगर येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराची सेप्टिक टँक उपसण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला.

यमनाप्पा मदार (२४, रा. लक्ष्मीनगर-म्हापसा, मूळ बेळगाव) असे मयताचे नाव आहे. गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना काल गुरुवारी उत्तररात्री १२ वाजल्यानंतर घडली. म्हापसा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली.

उपलब्ध माहितीनुसार, एकतानगर भागातील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराची सेप्टिक टँक रिकामी करण्याचे काम काल रात्री चार कामगारांनी हाती घेतले होते. यातील यमनाप्पा हा कामगार टँकमध्ये उरला होता. टँकचे तोंड अरुंद आणि खोली साधारण ४ मीटर खोल आहे. यातून तो आतमध्ये गेला आणि काही वेळात बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार आत उतरला, मात्र श्वास कोंडू लागल्याने तोही लगेच वर आला.

अखेर म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे जवान तिथे पोहोचले असता टँकचे तोंड अगदी लहान असल्याचे तसेच आत घातक वायू साठून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तोंड कापून मोठे केले आणि एक जवान सुरक्षेची साधने वापरून आत उतरला. त्याने बेशुद्ध कामगाराला बाहेर काढले. नंतर त्याला इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टँकमध्ये साठलेल्या घातक वायूमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे.

Web Title: Worker dies of suffocation in septic tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.