स्मार्ट सिटीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दबून कामगार मरण: रायबंदर येथील घटना

By पूजा प्रभूगावकर | Published: October 16, 2023 01:37 PM2023-10-16T13:37:28+5:302023-10-16T13:37:52+5:30

स्थानिकांकडून संताप व्यक्त

Worker dies under debris while working on Smart City: Incident at Raibandar | स्मार्ट सिटीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दबून कामगार मरण: रायबंदर येथील घटना

स्मार्ट सिटीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दबून कामगार मरण: रायबंदर येथील घटना

पणजी: रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम सुरु असताना खड्डयातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा दुर्देवी अंत आहे. यामुळे स्मार्ट सिटीचे नियोजनशुध्द काम उघड झाले असून या घटनेवर रायबंदरवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

सदर घटना ही सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभाग ते विठ्ठल मंदिर दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपणी प्रकल्पाची पाईपलाईन घालण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. सदर काम सुरु असताना खड्डयात उतरलेल्या या कामगारावर मातीचा ढिगारा पडल्याने तो त्याखाली बदला गेला.
सदर घटना घडताच जुने गोवे येथीलअग्नीशमन दलाला बोलावले. दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तसेच जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करुन या कामगाराला बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिनीतून त्याला गोमेकॉत पाठवले. मात्र त्याला मृत घोषित केले. महत्वाचे म्हणजे जेव्हा सदर घटना घडली, तेव्हा याठिकाणी स्मार्ट टिसीचा एकही अधिकारी किंवा सुपरवायझर तेथे हजर नव्हता.

दरम्यान, स्मार्ट सिटीकडून बेशिस्तपणे तसेच नियोजनाअभावी काम केले जात आहे. घटना घडली तेव्हा रुग्णवाहिकेला सुध्दा दाखल होण्यावस वाट मिळत नव्हती. अखेर स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यात आली. सदर प्रकारावार रायबंदरवासियांनी संताप व्यक्त केला असून जर कामगारांची सुरक्षा कामाच्या ठिकाणी जर स्मार्ट सिटी घेऊ शकत नाही, तर मग स्थानिकांची काय घेणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.

Web Title: Worker dies under debris while working on Smart City: Incident at Raibandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.