काटे-बायणा समुद्रात नौका उलटून एका कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 09:37 PM2018-07-28T21:37:58+5:302018-07-28T21:38:26+5:30

शनिवारी (दि. २८) सकाळी बायणा समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असलेली नौका किनाऱ्यापासून सुमारे ५० मीटर आत पोहोचल्यानंतर वादळी वा-यामुळे समुद्रात उलटून झालेल्या दुर्घटनेत नौकेवर असलेल्या ३३ वर्षीय सुरेश तांडेल याचा बुडून मृत्यू झाला

A worker was killed and two injured when boat rammed into Kate-Byyana Sea | काटे-बायणा समुद्रात नौका उलटून एका कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण जखमी

काटे-बायणा समुद्रात नौका उलटून एका कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण जखमी

Next
<p>वास्को: शनिवारी (दि. २८) सकाळी बायणा समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असलेली नौका किनाऱ्यापासून सुमारे ५० मीटर आत पोहोचल्यानंतर वादळी वा-यामुळे समुद्रात उलटून झालेल्या दुर्घटनेत नौकेवर असलेल्या ३३ वर्षीय सुरेश तांडेल याचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार जखमी झाल्याने त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. समुद्रात उलटलेल्या ह्या मासेमारी नौकेवर घटनेच्या वेळी ९ कामगार असून घटना घडल्याचे किना-यावर असलेल्या स्थानिक मासेमा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित समुद्रात धाव घेऊन बुडणा-या सर्व कामगारांना बाहेर काढले, मात्र नंतर तांडेल याचा मृत्यू झाल्याचे इस्पितळात घोषित करण्यात आले.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.३० च्या सुमारास सदर घटना घडली. नौका समुद्रात उलटल्याचे येथील स्थायिक मासेमा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित किना-यावर असलेल्या नौकेच्या मदतीने घटनास्थळावर जाऊन बुडत असलेल्या कामगारांना मदतीचा हात देऊन वर काढण्यास सुरुवात केली. स्थायिक मासेमा-याबरोबरच बायणा किना-यावर असलेल्या जीवरक्षकांनी जेटस्कीची मदत घेऊन नंतर बुडत असलेल्या ९ ही जणांना बाहेर काढून त्वरित उपचारासाठी बायणा येथे असलेल्या खासगी इस्पितळात नेले. इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच सुरेश मृत्युमुखी पडल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सकाळच्या ह्या घटनेत ३७ वर्षीय मुन्ना जैस्वाल व ४५ वर्षीय पुतीया चलवादी हे जखमी झालेले असून त्यांच्यावर इस्पितळात सध्या उपचार चालू आहे.

दरम्यान शुक्रवारी (दि.२७) सकाळी बायणा समुद्र किना-यावर अशाच प्रकारे अन्य एक मासेमारी नौका उलटून यात असलेल्या ११ कामगारांचा जीव धोक्यात आला होता. सदर घटना येथे असलेल्या जीवरक्षकांना दिसून येताच त्यांनी त्वरित समुद्रात धाव घेऊन नंतर बुडत असलेल्या सर्वांना सुखरुपरीत्या बाहेर काढले होते.

Web Title: A worker was killed and two injured when boat rammed into Kate-Byyana Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.