स्मार्ट सिटी बनविताना ढिगार्याखाली सापडून कामगार सापडून ठार
By वासुदेव.पागी | Published: October 16, 2023 03:03 PM2023-10-16T15:03:03+5:302023-10-16T15:03:07+5:30
या दुर्दैवी कामगाराचे नाव अंगद पंडित असे असून तो स्मार्ट सिटीच्या कामासाठी गोव्यात आला होता.
पणजी: रायबंदर पणजी येथे स्मार्ट सिटी चे काम हे किती असुरक्षित परिस्थितीत चालू आहे हे एका कामगाराचा जीव गेल्यावर उघड झाले आहे. खोदकाम करत असताना बिहारमधील कामगाराचा मातीच्या ढिगार्यात अडकून मृत्यू झाला.
या दुर्दैवी कामगाराचे नाव अंगद पंडित असे असून तो स्मार्ट सिटीच्या कामासाठी गोव्यात आला होता. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. दिवाडी फेरी धक्क्याजवळ खोदकाम सुरू होते. कामगार खोदत होते आणि खोदता खोदता अचानक पाणी लागले. मांडवी चे पाणी वेगाने आल्यामुळे माती कोसळून पडली आणि या मातीच्या ढिगार्याखाली कामगार पुरला गेला. बचाव पथके या ठिकाणी पोहोचून माती उपसून कामगाराला वर काडी पर्यंत उशीर झाला होता. तो बेशुद्ध अवस्थेत होता, परंतु त्या अवस्थेतून तो उठलाच नाही आणि इस्पितळात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.