निवाडयाची लिखित प्रती तयार केल्या नाहीत, गोव्यातील मडगावच्या न्यायदडांधिकारी अरुणा फर्नांडीस निलंबीत
By सूरज.नाईकपवार | Published: January 3, 2024 03:42 PM2024-01-03T15:42:00+5:302024-01-03T15:43:29+5:30
गोव्यातील मडगावच्या वरिष्ठ विभागीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अरुणा फर्नांडीस यांच्यावर निलंबनाची पाळी ओढावली.
मडगाव: गोव्यातील मडगावच्या वरिष्ठ विभागीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अरुणा फर्नांडीस यांच्यावर निलंबनाची पाळी ओढावली. केपे न्यायालयात असताना त्यांनी खुल्या न्यायालयात जाहीर केलेल्या निवाड्याची प्रत तयार केली नसल्याने पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती मिळाल्या नव्हता. नंतर संबधी न्यायदंडाधिकारी फर्नांडिस यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. मागाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीकडून यासंबधीची चौकशी सुरु झाली होती.
तक्रारीत तथ्य आढळून आले होते.न्यायदंडाधिकारी फर्नांडिस यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दक्षिण गोव्याचे प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांनी जारी केला आहे. केपे न्यायालयात असताना , त्यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांची बदली मागाहून पणजी न्यायालयात केली होती. आठच दिवसांपुर्वी त्यांची तेथून बदली मडगावच्या न्यायालयात झाली होती. पुर्वी त्या काणकोण येथील न्यायालयात होत्या. नंतर त्यांची बदली केपे व मागाहून पणजी येथे झाली होती.