गोव्यात सरकारी अधिका-यांमध्ये योगाची आवड वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 06:23 PM2018-06-20T18:23:39+5:302018-06-20T18:23:39+5:30
गोव्यात सरकारी अधिकारी व कर्मचा:यांमध्ये दहा वर्षापूर्वी जास्त आवड दिसून येत नव्हती. मात्र आता प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
पणजी : गोव्यात सरकारी अधिकारी व कर्मचा:यांमध्ये दहा वर्षापूर्वी जास्त आवड दिसून येत नव्हती. मात्र आता प्रमाण लक्षणीय वाढले आहे. योगा वर्गाना जाणा:या अधिका:यांमध्ये चाळीशी व पन्नाशी ओलांडलेले जास्त अधिकारी व कर्मचारी दिसून येऊ लागले आहेत.
गोवा योग अकादमीने राज्यभर प्रभावीपणो योगाचे वर्ग घेणो सुरू केले आहे. अन्य संस्थांकडूनही योगाचे वर्ग घेतले जातात. मुरगाव, बार्देश अशा तालुक्यांमध्ये विद्याथ्र्यासाठी विद्यालयात जाऊन योगाचे वर्ग योगप्रमुख प्रदीप नागवेकर व अन्य काही योग प्रशिक्षक घेत आहेत. विद्याथ्र्यामध्ये योगाची आवड रुजविण्याचे काम राज्यभरातील योग प्रशिक्षक करत आहेत. मात्र काही योग प्रशिक्षकांचे म्हणणो आहे, की गोवा सरकारच्या प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी योगामध्ये आता नियमितपणो भाग घेत आहेत. योगा प्रशिक्षणात ते रस घेत आहेत.
योग अकादमीने नियुक्त केले नागवेकर लोकतमशी बोलताना म्हणाले, की अकादमी जरी आता स्थापन झाली तरी, गेल्या पाच वर्षापासून मी योगाशीनिगडीत आहे. आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनीही गोव्यात योगाच्या प्रसाराच्या कामात खूप रस घेतलेला आहे. गोवा सरकारच्या आरोग्य खात्यात आयुष विभाग स्थापन केला गेला आहे. दत्ता भट व अन्य अधिकारी या विभागामार्फत योगाच्या प्रसारासाठी वावरतात. सरकारी अधिका:यांवर सक्ती नाही पण अधिका:यांनी आवड दाखवून योगामध्ये सहभागी व्हावे असा प्रयत्न या विभागाकडूनही केला जातो.
नागवेकर म्हणाले, की योगामध्ये संचालक, अधीक्षक यांच्या स्तरापासून कारकुन व अन्य कर्मचारी भाग घेत आहेत. त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी योगा करावा असे वाटते. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच शिवाय रोजचे काम करण्यामध्येही उत्साह येतो. कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. शरीराच्या तक्रारी कमी होतात. मला खात्री आहे, पुढील पाच वर्षात सरकारी अधिका:यांमध्ये योगाबाबतची आवड आणखी वाढणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारी अधिकारी व कर्मचा:यांची संख्या ही एकूण 55 हजार आहे. नव्यानेच जे नोकरीला लागले आहेत, असे युवा कर्मचारी किंवा अधिकारी योगाकडे वळलेले नाहीत पण ज्यांनी सेवेत काही वर्षे पूर्ण केली आहेत व ज्यांना आता आपले पोट सुटत चाललेय किंवा अन्य एखादा बदल शरीरात आढळून येत आहे, असे अधिकारी न चुकता योगामध्ये भाग घेतात. जीममध्ये जाण्याऐवजी योगाच्या वर्गाला जाणो चांगले, असे काही अधिकारी बोलून दाखवतात.