मुंबईतून पळून आलेली युवती मडगावात सापडली; अखेर पालकांच्या स्वाधीन
By सूरज.नाईकपवार | Published: October 14, 2023 03:12 PM2023-10-14T15:12:03+5:302023-10-14T15:12:26+5:30
घरातून जाताना त्या मुलीने आपला मोबाईलही घरीच सोडला होता. त्यावर आपण घर सोडून जात असल्याचे मेसेज लिहिला होता
सूरज नाईकपवार / मडगाव
मडगाव: घरातील वडीलधाऱ्यांनी काही कारणास्तव दम दिल्याने मुंबईतून रेल्वेतून गोव्यात आलेली एक १९ वर्षीय युवती मडगावात सापडली. शुक्रवारी रात्री ही युवती मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात गडबडलेल्या अवस्थेत फिरत असताना, गस्तीवरील पोलिसांंच्या द्ष्टिस पडली. तिची पोलिसांनी विचारपूस केली. सुरुवातीला ती काही दाद देण्याच्या तयारीत नव्हती. नंतर मात्र तिने आपले मन मोकळे करुन आपण मुंबईतील असल्याचे सांगितले.ही युवती वांद्रा मुबंई येथील आहे.
घरातून जाताना त्या मुलीने आपला मोबाईलही घरीच सोडला होता. त्यावर आपण घर सोडून जात असल्याचे मेसेज लिहिला होता. पोलिस तक्रार झाल्यानंतर सर्वत्र बिनतारी संदेश पाठवून देण्यात आला होता. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निता कवळेकर, आश्विती नाईक, रोशनी चाैधरी यांनी त्या युवतीला ताब्यात घेतले. व नंतर त्यासंबधी मुंबई पोलिसांना कळविण्यात आले. शनिवारी तिचे पालक येउन मुलीला ताब्यात घेउन परत निघाले.