किना-यावरील स्वच्छतेसाठी ‘तेरा मेरा बिच’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 08:13 PM2017-11-24T20:13:39+5:302017-11-24T20:13:42+5:30
गोव्यातील प्रमुख समुद्र किना-यावर स्वच्छता ठेवण्यासाठी ‘तेरा मेरा बिच’ ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
म्हापसा : गोव्यातील प्रमुख समुद्र किना-यावर स्वच्छता ठेवण्यासाठी ‘तेरा मेरा बिच’ ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. कळंगुट येथील किना-यावर शुक्रवारी उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
किनाºयावर साफसफाई करण्याचे कंत्राट दृष्टी या किनाºयावर सुरक्षा पुरवणाºया जीवरक्षक कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या वतिने कांदोळी, कळंगुट, बागा, मिरामार तसेच कोलवा या राज्यातील महत्त्वाच्या किनाºयावर साफसफाई ठेवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कंपनीच्या वतिने ‘तेरा मेरा बिच’ या मोहिमेअंतर्गत किनाºयावर साफसफाईसाठी सुरू करण्याचे हाती घेण्यात आले आहे. पुढील दिडशे दिवस ही मोहीम किनाºयावर राबवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला लोबो यांच्यासोबत दृष्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर उपस्थित होते.
गोव्यातील समुद्र किनारे अस्वच्छ आहेत. कचºयाने भरलेले आहेत. त्यामुळे लोकांनी तिथे जाऊ नये अशा प्रकारे गोव्याची बदनामी करणारी मोहीम विशिष्ठ लोकांनी हाती घेतली होती; पण लोकांना स्वच्छ किनारे देण्यासाठी सरकार बांधील असल्याचे मत उपसभापती तसेच कचरा व्यवस्थापन महमंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी यावेळी व्यक्त केले.
गोव्याची बदनामी करणा-या या कच-याच्या प्रश्नावर २०१२ साली तोडगा काढण्यात आला. सरकारने साळगाव येथे आदर्श ठरू शकणारा असा कचरा प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातून कचºयाच्या विल्हेवाट बरोबर वीज निर्मिती होऊ लागली आहे. या प्रकल्पामुळे त्यामुळे राज्यातील कचºयावर किमान ३० टक्के तरी तोडगा येऊ शकला. रस्त्याच्याकडेला दिसणारा कचरा, बियरच्या बाटल्यांचे प्रमाण कमी झाल्याचे लोबो म्हणाले. कच-या कमी होणा-या प्रमाणात आणखीन वाढवणे गरजेचे असल्याचे लोबो म्हणाले. देशात राजकारणी हातात झाडून घेऊन स्वच्छता मोहीम राबवतात. गोव्यात मात्र ही मोहीम वेगळ््या पद्धतीने राबवली जाते. सर्व जण जबाबदारीने मोहीम हाती घेतात व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात असेही त्यांनी सांगितले. लोकांना किना-यावर स्वच्छता पाहिजे असल्यास किनाºयावर बाटल्या घेऊन जाणे टाळावे असाही सल्ला त्यांनी दिला. किनाºयावर बियर बाटल्यांच्या वापरावर मर्यादा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील किनाºयां बरोबर इतर भाग प्लास्टीक मुक्त होणे गरजेचे असून त्यासाठी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बरोबर चर्चा केली आहे. प्लास्टीकवर बंदी लागू करण्याची मागणी आपण या बैठकी दरम्यान केली असल्याचे लोबो म्हणाले.