विशी-बावीशीतील गोमंतकीय तरुण ड्रग पेडलिंगच्या व्यवसायात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:50 PM2019-03-25T19:50:57+5:302019-03-25T19:51:12+5:30

निम्मे गोमंतकीय : मागच्या दहा दिवसात पकडलेल्या 16 पैकी 11 संशयित विशीतील

youth in drug trafficking profession | विशी-बावीशीतील गोमंतकीय तरुण ड्रग पेडलिंगच्या व्यवसायात

विशी-बावीशीतील गोमंतकीय तरुण ड्रग पेडलिंगच्या व्यवसायात

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: कॅच देम यंग ही मात्र गोव्यात इतर ठिकाणी जरी फारशी चालली नसली तरी गुन्हेगारी क्षेत्रत ती लागू झाली आहे. विशेषत: ड्रग्स पेडलिंगच्या व्यवसायात विशी-बावीसीतील तरुण दिसू लागले असून यातील निम्मे तरुण स्थानिक असल्याने गोव्यात अंमलीपदार्थ अगदी घराच्या उंबरठय़ार्पयत पोहोचले आहेत हे दिसून येऊ लागले आहे.


मागच्या दहा दिवसात गोव्यात अंमलीपदार्थ संदर्भातील 16 प्रकरणांची नोंद झाली आहे. या प्रकरणात 16 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 11 प्रकरणांतील आरोपी 19 ते 25 या वयोगटातील आहेत. याहीपेक्षा चिंताजनक गोष्ट म्हणजे, या प्रकरणात ज्या 16 जणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी सातजण स्थानिक युवक आहेत.


मागच्या दहा दिवसात (12 ते 22 मार्च)  पोलिसांनी एकूण 15.77 लाखांचे अंमलीपदार्थ पकडले असून त्यापैकी 80 टक्के प्रकरणो गांजाशी निगडीत आहेत. किनारपट्टी भागाबरोबरच पणजी, वास्को, मडगाव, फोंडा व कुडचडे या भागात हे ड्रग पेडलर्स सापडल्याने गोव्यातील अंतर्गत भागातही अंमलीपदार्थ पोहोचले आहेत हे स्पष्ट झाले आहे. 


गोव्यातील तरुण अंमली पदार्थाकडे वळले आहेत याची वानगीदाखल उदाहरणो अशी आहेत. 14 मार्च रोजी आल्त-दाबोळी येथे एका 27 वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून 50 हजारांचा गांजा पकडला होता. त्याच दिवशी सोनसडो-राय येथे फातोर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मडगावातील एका 19 वर्षीय युवकाला पकडले होते. दोनच दिवसांनी म्हणजे 16 मार्च रोजी कुडचडेच्या एका 20 वर्षीय युवकाला अटक करुन त्याच्याकडून 20 हजाराचा गांजा पकडला होता. तर 17 मार्च रोजी कुर्टी-फोंडा येथे पकडलेल्या एका 20 वर्षीय युवकाकडे तब्बल साडेतीन लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. 19 व 20 मार्च रोजी वास्कोतच अशाप्रकारे दोघां विशींतल्या युवकांना अटक करुन त्यांच्याकडून प्रत्येकी दहा हजारांचा गांजा जप्त केला होता.


अंमली पदार्थासारख्या व्यवहारातून सहज मोठय़ा प्रमाणावर पैसा मिळतो याची जाणीव झाल्यानंतर आता दुर्दैवाने स्थानिक युवकही या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. त्यातील काहीजण स्वत:च अंमली पदार्थाचे सेवन करणारे आहेत. या युवकांना या नशेपासून दूर करण्यासाठी खास जागृतीची गरज अंमलीपदार्थ विरोधी विभागातून हल्लीच निवृत्त झालेले पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यापूर्वी गोव्यात भटक्या मुलांमध्ये इंक रिमुव्हरचा वास घेऊन नशा करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी आम्ही एन्जीओंना हाताशी धरुन जागृती सूरु केली होती. या जागृतीला प्रतिसादही चांगला मिळाला होता. आता अंमली पदार्थाच्या बाबतीतही अशाचप्रकारे जागृती हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले ड्रग्स
गोव्यात अंमली पदार्थाचे व्यसन आतार्पयत पर्यटकांमध्ये आणि मेहनतीची कामे करणा:या कामगारांमध्ये असल्याचे मानले जात होते. मात्र आता हे व्यसन अगदी विद्याथ्र्यार्पयतही पोहोचले आहे. मागच्यावर्षी मडगावच्या एका महाविद्यालयाच्या परिसरात ड्रग्स विकताना काहीजणांना अटक केली होती. फर्मागुढी-फोंडा येथे शैक्षणिक संस्थांच्या आवारातही असे ड्रग पेडलर्स सापडले होते. कुडचडेतील एका शैक्षणिक आस्थापनाच्या जबाबदार पदाधिका:याने धक्कादायक माहिती देताना, आपल्या शाळेच्या बाहेर सायंकाळी असे प्रकार होतात हे लक्षात आल्यानंतर शाळेच्या आवारात येणा:या सर्व मोकळ्या वाटा बंद करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला असे ते म्हणाले.

तुरुंगातही ड्रग्स
केवळ शैक्षणिक आस्थापनेच नव्हे तर अगदी तुरुंगातही ड्रग्स खुलेआम मिळतात असे सांगण्यात येते. या आरोपात तथ्य असू शकते याचा प्रत्यय 13 मार्च रोजी कोलवाळच्या तुरुंगात आला. कोलवाळच्या तुरुंगात जेलगार्ड म्हणून काम करणा:या शंभू नाईक याच्याकडे डय़ूटीवर असताना 10 हजाराचा गांजा सापडल्याने त्याला निलंबित करण्यात आले. यापूर्वीही कोलवाळच्या या तुरुंगात असे प्रकार घडले असून त्यामुळे ड्रग्सपासून तुरुंगही सुटलेला नाही हेही स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: youth in drug trafficking profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.