ढवळीत अपघातात युवक ठार
By admin | Published: April 16, 2016 02:39 AM2016-04-16T02:39:05+5:302016-04-16T02:40:30+5:30
फोंडा : राज्यात शुक्रवारपासून रस्ता सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी अपघातांचे सत्र सुरूच आहे. ढवळी-फर्मागुडी
फोंडा : राज्यात शुक्रवारपासून रस्ता सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी अपघातांचे सत्र सुरूच आहे. ढवळी-फर्मागुडी बगल मार्गावर दुचाकी आणि टॅँकर यांच्यात झालेल्या अपघातात आदर्श प्रकाश हेगडे (२५, मूळ चित्रदुर्ग-कर्नाटक, सध्या रा. दाग-फोंडा) हा युवक जागीच ठार झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
आदर्श हेगडे हा फोंडा फायर स्टेशनजवळील एका आस्थापनात काम करत होता. शुक्रवारी सकाळी तो केए-१६-ईसी-३८५१ क्रमांकाच्या मेस्ट्रो दुचाकीवरून फर्मागुडीहून ढवळीच्या दिशेने जात असता ढवळीहून फर्मागुडीच्या दिशेने येणाऱ्या जीए-0१-झेड-३३0 या आॅईलवाहू टँकरला धडक दिली. तो मागच्या चाकाखाली सापडल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हेगडे याच्या चित्रदुर्ग येथील कुटुंबीयांना कळविण्यात आले असून ते आल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)