अग्निसंकट निवारण्यास धावला सत्तरीतील युवावर्ग; सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक, डॉक्टर, वकील, कर्मचारी सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:59 AM2023-03-15T10:59:57+5:302023-03-15T11:00:32+5:30
सत्तरीतील डोंगराळ भागात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत.
गणेश शेटकर, लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः सत्तरीतील डोंगराळ भागात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. गेले अनेक दिवस नौदल, अग्निशमन दल, वन खाते तसेच इतर यंत्रणा आग विझविण्याच्या कामात व्यस्थ आहेत. परिसरातील नागरिकही या यंत्रणांना मदत करीत आहेत. सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिक्षक, डॉक्टर, वकील, सरकारी तसेच खासगी आस्थापनात काम करणाऱ्या अनेक युवकांनी आग विझविण्यास मदत केली.
समाज माध्यमे तसेच वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून अनेक युवक मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत असून याकारिता अनेकांचे सहकार्यही मिळत आहे.
सरकारी यंत्रणा आपले काम करतातच आहेत, सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकही आपली जबाबदारी समजून पुढे सरसावत आहेत. मदत कार्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना आवश्यक सर्वतोपरी सहकार्य वन खात्यातर्फे मिळत असून साहित्य तसेच अल्पोपहाराची सोय वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
सुटीचा दिवस रानात......
सत्तरी तसेत राज्यभरातील इतर भागात अनेक जणांनी रविवारी आठवड्याची सुटी पूर्ण दिवस आग विझविण्यासाठी रानात घालवली. शिक्षक असलेले फेरी सत्तरी येथील गोपीनाथ गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार सैम जलनाय गटातर्फे रविवारी सत्तरीतील दरोडे रानात सुमारे १२ ते १४ हेक्टर परि- सरातील आग विझविण्यात यश मिळविले. तसेच आग उतरत्र पसरू नये याकरिता रीस मारण्यात आली आहे.
वाळपईचे आरएफओ गिरीश बेलूडकर यांच्या नेतृत्वाखाली वन खात्याच्या इतर कर्मचारांसोबत सुमारे तीस जणांची टीम मोहिमेत सहभागी झाली. सत्तरी, डिचोली, पणजी, सांखळी, अस्नोडा, पेडणे, म्हापसा, सर्वण येथील युवक आग विझविण्याच्या मोहिमेत सहभागी झाले.
विवेकानंद पर्यावरण जागृती फौजही सक्रिय
केरी सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फॉजवे कार्यकर्तेही आग विझवण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. रविवारी भगवान महावीर अभयारण्य परिसरात लागलेली आग विझविली. या मोहिमेत वेबचे १२. फोडा येथील चरण देसाय यांच्या नेतृत्वाखाली सेव्ह संस्थेच्या १५ जणांची टीम तसेच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ६२ जणांची फौज दिवसभर आग विझविण्याच्या कामात व्यस्त होती.
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या श्रद्धा रांगणेकर यांनीही या मोहिमेत भाग घेऊन महिलांसाठी आदर्श ठरल्या. वेदचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान महावीर अभ यारण्यात रविवारी २२ किलोमीटरचे पदभ्रमण केले.
या मोहिमेत तीन वेगवेगळ्या तुकड्या करून आग विझविण्याचे काम केले. आगीत मोठ्या प्रमाणात शेकडो वर्षांची झाडे खाक झाली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"