पाणीटंचाई निवारणार्थ कामांसाठी १ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:37+5:302021-06-11T04:20:37+5:30
गोंदिया तालुक्यातील १४, आमगाव तालुका ६ व देवरी तालुक्यातील ६, अशा एकूण २३ गावातील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व ...
गोंदिया तालुक्यातील १४, आमगाव तालुका ६ व देवरी तालुक्यातील ६, अशा एकूण २३ गावातील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहीर खोलीकरण इनवेल बोअर करणे. सडक अर्जुनी तालुक्यातील १९, अर्जुनी मोरगाव तालुका १९, गोरेगाव तालुका ५, गोंदिया तालुका १७, तिरोडा तालुका २५, देवरी तालुका २३ व सालेकसा तालुक्यातील ४, अशा एकूण १०३ गावात नवीन विंधन विहिरी तयारी करण्याच्या कामांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता दिली आहे. गोंदिया तालुक्यातील चंगेरा, वडेगाव, कोचेवाही, मरारटोला (कोचेवाही), सतोना, तांडा, अदासी, सेजगाव, एकोडी, दतोरा, माकडी, मुरपार, घिवारी, बिरसी (कॅम्प). आमगाव तालुक्यातील टाकरी, कवडी, पाउलदौना, सावंगी, पिपरटोला, अंजोरा, देवरी तालुक्यातील शिरपूर, गडेगाव, वांढरा अशा एकूण २३ ठिकाणी १५ लक्ष ९ हजार ६९७ रुपयांमधून सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहीर खोलीकरण इनवेल बोअर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २३ ठिकाणी १५ लक्ष ९ हजार ६९७ रुपयांमधून सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहीर खोलीकरण इनवेल बोअर करणे आणि १०३ ठिकाणी १ कोटी १९ लक्ष १७ हजार ३२ रुपयांमधून नवीन विंधन विहिरी तयार करणे. अशा एकूण १२६ ठिकाणी १ कोटी ३४ लक्ष २७ हजार १९ रुपयांमधून कामे करण्यात येणार आहे.