आधुनिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी मेडीकलला १ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:06 PM2019-03-14T21:06:35+5:302019-03-14T21:07:08+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होवून तीन चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही विविध आरोग्यविषयक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाकडे अनेकदा निधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबईने यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ८ मार्चला मंजुरी दिली आहे.त्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हॉपकिन बायो-फार्मास्युटीकल कॉर्पोेरेशन लि.मुंबईच्या माध्यमातून ही यंत्रसामुग्रीे खरेदी करण्यात येणार आहे.
या यंत्रसामुग्रीची खरेदी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त होणाऱ्या १ कोटी रुपयांच्या निधीतून अल्ट्रासोनिक जनरेटर व डिसेक्टर, डायोड लेजर सिस्टम, अॅटोमेटेड एचपीएलसी सिस्टम फॉर थॅलसिमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथील टेस्टींग व स्क्रीनिंग, सिरीज पंप यासह इतर यंत्र सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे.