जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने १० शिक्षक सन्मानित ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:59+5:302021-07-23T04:18:59+5:30
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीप डांगे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सामान्य प्रशासनाचे नरेश भांडारकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन ...
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीप डांगे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सामान्य प्रशासनाचे नरेश भांडारकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी आर.एल.पुराम, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय गणवीर, समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप समरीत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये, प्राथमिक शिक्षण विभागातून गोंदिया तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा एकोडी येथील मंजू उके, आमगाव तालुक्यातून ठाणा शाळेतील शिवाजी बढे, देवरी तालुक्यातून भरेगाव शाळेतील ज्योती डांबरे, सडक-अर्जुनी तालुक्यातून पळसगाव-राका शाळेतील सुरेश फुंडे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून माहुरकडा शाळेतील लोकराज सेलोकर, गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा शाळेतील शिक्षिका सिंधू मोटघरे, तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा शाळेतील लिलाधर बघेले यांना तर माध्यमिक शिक्षण विभागातून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील दिनेशकुमार अंबादे, अर्जुनी-मोरगाव येथील धापाल शहारे व सालेकसा तालुक्यातील साखरीटोला जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील श्रावण मडावी या १० शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन दिपिका बोरकर यांनी केले. आभार दिलीप बघेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी डी.जे. मालाधरी, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, कक्ष अधिकारी रवींद्र जनबंधू, सहाय्यक प्रशासन अधिकारी डोंगरे, समग्र शिक्षा अभियानाचे नितेश खंडेलवाल, बाळकृष्ण बिसेन यांनी सहकार्य केले.