बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:56 AM2018-12-22T00:56:31+5:302018-12-22T00:57:54+5:30
जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयातील न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट दुराचार प्रकरणी निर्णयाची सुनावणी करताना ४२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयातील न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट दुराचार प्रकरणी निर्णयाची सुनावणी करताना ४२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
तिरोडा तालुक्यातील पिपरिया येथील फिर्यादी २१ वर्षीय युवती २ नोव्हेंबर २०१५ ला शिकवणी वर्गात गेली होती. सुटी झाल्यानंतर एका मैत्रिणीसोबत पायी तिरोडा बसस्थानक जाण्यासाठी निघाली. यातच आरोपी महेश मदन मस्करे (४२) याने दुचाकी रस्त्यावर थांबवून बसस्थानकपर्यंत सोडून देतो असे सांगितले. मात्र दुचाकी बसस्थानक जवळून थांबविता बाघोली जाणाऱ्या मार्गाने पिपरीया ते चांदोरी गावाकडे जाणाºया मार्गावर नेवून थांबविले. तसेच सुना मौका साधून आरोपीने फिर्यादीला रस्त्याकडेला असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केले. याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र दोन आठवड्याचा कालावधी लोटल्यानंतर १७ नोव्हेंबरला तिरोडा ठाण्यात घटनेची तक्रार करण्यात आली. वैद्यकीय परीक्षण व सखोल तपासानंतर सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी जिल्हा अप्पर व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले. साक्ष व ठोस पुराव्यावरून ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधिश कोठेकर यांनी आरोपीला दोषी ठरवित १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड.चुटे यांनी बाजू मांडली.
मारहाण करणाºयाला एक वर्षाचा सश्रम कारावास
गोंदियातील उत्तम नरसिंह गहरवार यांना १३ आॅगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता विटाने मारून डोके फोडणाºया रमेशसिंग सोमवंशी (४२) रा. गौतमनगर बाजपेयी वॉर्ड गोंदिया याला जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. विनाकारण शिविगाळ करून उत्तमला डोक्यावर विटाने मारले होते. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यासाठी न्यायाधीश विशाल साठे यांनी १९ डिसेंबरला सुनावणी करताना आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड ठोठावला आहे.