प्रियकराला १० वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:22 PM2018-05-07T22:22:08+5:302018-05-07T22:22:08+5:30
लग्नाच्या पूर्वी लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. परंतु लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या खमारी येथील प्रियकराला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी (दि.७) सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लग्नाच्या पूर्वी लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. परंतु लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या खमारी येथील प्रियकराला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी (दि.७) सुनावली. रवि रमेश किरणापुरे (२५) रा. खमारी असे आरोपीचे नाव आहे.
रविने गावातीलच २० वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्याशी जवळीक साधली. एप्रिल २०१४ मध्ये त्याचे लग्न झाले. तेव्हा पिडीत मुलीने लग्नासंदर्भात विचारणा केल्यावर तिला सोडून तुझ्याशी लग्न करीन असे बोलून पिडीतेची मनधरणी केली होती. त्यानंतरही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फेब्रुवारी २०१५ मध्ये तिला गर्भधारणा झाली. याची माहिती त्याला दिल्यावर त्याने जन्माला येणाºया बाळाला मी स्विकारेन अशी ही हमी दिली होती. सहा महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण सर्वाना समजले. तिने रविला आपल्या घरी बोलावून लग्नासंदर्भात विचारले असता त्याने लग्न करण्यास होकार देत तिच्या घरुन निघून गेला. त्यानंतर त्याने तिच्या घरी पाय सुध्दा ठेवला नाही. नंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१), ४१७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक न्हायंदे यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ शरद त्रिवेदी यांनी या प्रकरणावर सोमवारी सुनावणी केली. कलम ३७६ (१) अंतर्गत १० वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी शिक्षा कलम ४१७ अंतर्गत १ वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या दंडातील पाच हजार रुपये पिडीतेला देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून अॅड. वसंत चुटे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी खरोले, कºहाडे, वासु देशमुख यांनी काम पाहिले.
त्या मुलाचा केला डीएनए
रवि रमेश किरणापुरे याने प्रेमसंबंधातून आपल्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्याच्या प्रेयसीने गोंडस बाळाला जन्म दिला. ते बाळ रविचेच आहे किंवा नाही यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. त्या बाळाचा डीएनए रवि सोबत जुळला असून ते बाळ रविचाच असल्याचे स्पष्ट झाले.