१०० रक्तदात्यांची रक्तदानाने शाहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:25+5:302021-03-24T04:27:25+5:30
या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था ...
या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था अध्यक्ष लुनकरण चितलंगे यांचे हस्ते झाले. यावेळी डॉ. कैलास गाडेकर, डॉ. गजानन डोंगरवार,डॉ. श्रीकांत नाकाडे,उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वीर शहिदांना श्रद्धांजली आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने झाली. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तालुक्यातील हे सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरले. रक्तदात्यांना आयोजकांनी प्रशस्तीपत्र, मास्क आणि सॅनिटाइझर भेट दिले. शासकीय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथील रक्तपेढीचे डॉ.चव्हाण,अनिल गोंडाने आणि चमूने रक्त संकलनाचे कार्य केले. यावेळी निमाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.उल्हास गाडगोने,डॉ.रमेश कापगते,डॉ.राजेश चांडक,डॉ.दूर्वास झोडे,डॉ.भारत लाडे,वैशाली गाडगोने,सुनीता कापगते,डॉ.विजय खुणे,डॉ.दीपक रहेले, डॉ.युवराज कापगते,डॉ.तरुण मंडळ,डॉ.ज्ञानेश्वर कापगते,गिरीश बागडे, दिलीप लाडे व विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.