वडेगाव पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:51 AM2019-02-09T00:51:02+5:302019-02-09T00:51:20+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला.

100 brass sand stocks seized at Wadegaon rehabilitation | वडेगाव पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त

वडेगाव पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त

Next
ठळक मुद्देचार ट्रॅक्टरवर आकारला दंड : गोंदिया तहसील कार्यालयाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. सोबत चार ट्रॅक्टरवर प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रूपयाचा दंड आकारण्यात आला.
वैनगंगा व वाघनदीतून रेतीचा उपसा होत असूनही महसूल विभाग सुस्त आहे. घाट लिलाव न झाल्यामुळे रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु याकडे तहसीलदार लक्ष देत नाहीत. आमगाव तालुक्याच्या पाठोपाठ गोंदिया तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील रेती तस्करांना लगाम लावण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला कारवाई केली. त्यात १०० ब्रास रेतीचा साठा व रेती वाहून नेणारे चार ट्रॅक्टर एकाच दिवशी रंगेहात पकडले.
६ फेब्रुवारीला कोचेवाही येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी ४७५२ ट्राली एमएच ३५ एफ ३६९७ ला चालक प्रवीण टेकलाल मरकाम रा.कोचेवाही हा विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना मंडळ अधिकारी डी.एच.पोरचेट्टीवार यांनी पकडले. सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार संतोष पुरनलाल पटले रा.कोचेवाही यांच्या मालकीचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्टÑ जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. त्याच दिवशी अर्जुनी येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी ७२२७ ट्राली एमएच ३६ ९१०९ ला गैरअर्जदार राजकुवर हनुलाल दंदरे रा.बिरसोला हा चालवित होता. विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला.त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. अर्जुनी येथे गैरअर्जदार रामदास डोमा नागफासे रा.बिरसोला याच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर चालक उमेश सुंभारू नागफासे रा.बिरसोला हा विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. तेढवा येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी २२१९ ट्राली एमएच ३५ एफ २२१९ ला गैरअर्जदार दीपक जितसिंग नागपुरे रा. कन्हारटोला हा स्वत: विना परवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. चौघांवर करण्यात आलेल्या दंडाची रक्कम ४ लाख ६१ हजार ६०० रूपये आहे. सदर कारवाई खमारी येथील मंडळ अधिकारी पी.बी.तिवारी, डी.एच. पोरचट्टीवार, आशिष रामटेके, तलाठी आर.एस.नंबुलकर, ए.बी.बडोले, प्रफुल्ल मेश्राम, मुकुंद तिवारी यांनी केली आहे.

Web Title: 100 brass sand stocks seized at Wadegaon rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू