भजेपार येथे १०० टक्के लसीकरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:57+5:302021-05-19T04:30:57+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या वतीने भजेपार येथे करण्यात आले. यावेळी गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात ...

100% Vaccination at Bhajepar () | भजेपार येथे १०० टक्के लसीकरण ()

भजेपार येथे १०० टक्के लसीकरण ()

Next

प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या वतीने भजेपार येथे करण्यात आले. यावेळी गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, डाॅ. रुबी रिनाईत, डाॅ. तुलसी भगत यांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. ढमके, आरोग्य सेविका मेश्राम, लांडगे, बन्सोड, औषध वितरक तुमसरे, केंद्र प्रमुख विलास डोंगरे, उपसरपंच लेखीराम बोपचे, ग्रामसेवक व्ही. जी. भुते, मुख्याध्यापक तानसिंग जमाईवार, आर. एफ. भोंगाडे, आशा गटप्रवर्तक रेखा पटले, दीपा टेंभरे, आशा सेविका अनिता बघेले, कांता भेलावे, हंसकला भेलावे, अश्विनी मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: 100% Vaccination at Bhajepar ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.