१४ दिवसांत १०.७५ लाखांचा दंड वसूल

By admin | Published: June 17, 2017 12:13 AM2017-06-17T00:13:28+5:302017-06-17T00:13:28+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग मार्गावर धावणाऱ्या एकूण २१० प्रवासी गाड्या

10.75 lakh fine in 14 days | १४ दिवसांत १०.७५ लाखांचा दंड वसूल

१४ दिवसांत १०.७५ लाखांचा दंड वसूल

Next

दपूम रेल्वे: विशेष तिकीट तपासणी अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग मार्गावर धावणाऱ्या एकूण २१० प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांत १ ते १४ जून २०१७ पर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात रेल्वे कर्मचाऱ्यांनी १० लाख ७५ हजार ९५ रूपयांची दंडस्वरूपात वसुली केली.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळाच्या नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग मार्गावर १४ दिवसपर्यंत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात २१० प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये सदर अभियानांतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न केलेल्या लगेजचे चार हजार ०२४ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात १० लाख ७५ हजार ०९५ रूपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय केरकचरा पसरविणारे ३४ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात तीन हजार २५० रूपये वसूल करण्यात आले. या विशेष तिकीट तपासणी अंतर्गत इतवारी येथे किले बंदी चेकिंगदरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या पुढाकारात १२ जून २०१७ रोजी विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न करता लगेजचे ६१६ प्रकरणे केवळ एकाच दिवसात नोंदवून एकूण एक लाख ५६ हजार ३५० रूपये दंडस्वरूपात वसूल करण्यात आले.

आजारी प्रवाशांना सुट
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये आजारी रेल्वे प्रवाशांना सुट देण्यात आली आहे. याचप्रकारे जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्ये आजारी रेल्वे प्रवाशांनासुद्धा सुट सुविधा प्रदान केली जात आहे. मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये आजारी रेल्वे प्रवाशांना द्वितीय श्रेणी व एसी चेयरकारमध्ये आधीपासूनच सुटची सुविधा आहे. याच प्रकारे जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्येसुद्धा आजारी रेल्वे प्रवाशांंना द्वितीय श्रेणी व एसी चेयरकारमध्ये सुट सुविधा प्रदान केली जात आहे.

 

Web Title: 10.75 lakh fine in 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.