१० व १२ वीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:26 AM2021-03-15T04:26:54+5:302021-03-15T04:26:54+5:30
बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही ...
बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही अपूर्ण आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने या दोन्ही परीक्षांचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित मूल्यमापन पध्दतीने परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने काही लेखी परीक्षा घ्याव्यात. अथवा त्या रद्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे गुड्डू बोपचे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांच्याकडे केली.
कोरोनासारखे महाभंयकर संकट महाराष्ट्र व संपूर्ण जगात आले आहे. या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागले आहे. इंटरनेटमुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकले नाही. ग्रामीण भागात अवघा १ महिना शाळा सुरू झाली होती. पण तीसुध्दा कोरोनामुळे बंद झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसंदर्भात महत्त्वपूर्ण असलेली १२ व १० वीची परीक्षा अपूर्ण अभ्यास असताना कशी द्यावी, असा प्रश्न सवाल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी संबंधित बाबीवर गांर्भीयपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी बोपचे यांनी केली आहे.