११ कोटींची उपकरणे मात्र औषधासाठी पैसे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:19+5:30
गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना चांगला उपचार मिळावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उपकरणे नव्हती आता महिनाभरात ११ कोटीं पेक्षा अधिक रूपयांची विविध उपकरणे येणार आहेत.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक उपकरणांची कमतरता असल्यामुळे ११ कोटी ३ लाख १५ हजार ८१५ रूपयांची विविध उपकरणे पुरवली जात आहेत. परंतु याच वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांसाठी साधी औषधी उपलब्ध नसल्याची ओरड रूग्णांची आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना डॉक्टर सेवा देतील परंतु औषधी बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जात आहे.
गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना चांगला उपचार मिळावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उपकरणे नव्हती आता महिनाभरात ११ कोटीं पेक्षा अधिक रूपयांची विविध उपकरणे येणार आहेत. परंतु येथे डॉक्टरांची कमतरता त्यातच उपलब्ध डॉक्टरांकडून सेवा दिली जात असली तरी रूग्णांना औषध दिले जात नसल्याची बाब पुढे आली आहे.
परंतु या प्रकरणाला सावरण्यासाठी दररोज पाच हजार रूपयांची औषधी महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या निधीतून खरेदी करून दिली जात असल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पी. व्ही. रूखमोडे यांनी सांगितले. परंतु ही पाच हजाराची औषधी कोणत्या रूग्णांना दिली जाते याची माहितीच नाही.
बाई गंगाबाई महिला रूग्णालयात होणाºया गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी ५०० रूपये पर्यंतची औषधी डॉक्टर बाहेरुन आणण्यास सांगत आहेत. रूग्णांसाठी बाहेरून औषधी घेऊन आणा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. यासाठी डॉक्टरांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. मेडीकल कॉलेज, गंगाबाई महिला रूग्णालय येथील रूग्णांना लावण्यासाठी इंजेक्शन नाहीत. सिंरींज, निडल, आयव्ही कॅनुला नाही.
गंगाबाईत येणाºया गर्भवतींची प्रसूती करण्यासाठी लागणाºया औषधींत कॉर्ड फ्लॅटम, कॅटगॅट नंबर वन, कॅटगॅट नंबर टू,टॅक्सीम इंजेक्शन, बाळंतिनीची शस्त्रक्रिया केल्यानंतर लावण्यात येणारे पिप्झो ४.५ ग्रॅम, स्पायनल निडल नाहीत. सामान्य प्रसूतीसाठी सरव्ह्यूव प्राईल, बेटेडीन, इंजेक्शन ड्रोटीन, स्टाईल ग्लोज नाहीत. औषधे उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचा गोंधळ आहे. परंतु वैद्यकीय अधिष्ठाता दररोज पाच हजार रूपये एका प्रकारच्या औषधीसाठी खर्च करण्यात येते.
प्रत्येक प्रकारच्या औषधासाठी पाच हजार रूपये महात्मा फुले जीवनदायी योजनेतून खर्च करण्यात असल्याचे डॉ. पी. व्ही. रूखमोडे सांगितले. परंतु गंगाबाई महिला रूग्णालयात येणाºया बाळंतिनीना बाहेरून औषधी घेऊन यावे लागते.
यासाठी सामान्य प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसाठी ३०० ते ४०० रूपयाचे तर शस्त्रक्रिया होणाºया गर्भवतीसाठी ५०० ते ६०० पर्यंतची औषधी खासगी मेडीकलमधून रूग्णांच्या नातेवाईकांना विकत आणावी लागते. मेडीकल कॉलेजमधील रूग्णांसाठी ३ कोटीची सीटीस्कॅन मशीन, ११ व्हेंटीलेटर, एसएनसीयूमध्ये १२ फाऊलर बेड, दोन सिबीसी मशीन, डीफीलेटर, कॉर्डीक मॉनिटर अशी ११ कोटी ३ लाख रूपयाची उपकरणे महिनाभरात दाखल होत आहेत. परंतु या उपकरणांना ठेवायचे कुठे यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे डॉ. रूखमोडे म्हणाले.
मेडीकलमध्ये पीजीचे वर्ग
गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात १ नोव्हेंबरपासून पीजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी ४ स्त्रीरोगतज्ज्ञ, ४ बालरोगतज्ज्ञ, २ अस्थीरोगतज्ज्ञ, २ नेत्ररोगतज्ज्ञ असे १२ तज्ज्ञ तर दुसऱ्या वर्षीपासून सोनोग्राफीसाठी दोन तज्ज्ञ दिले जाणार आहेत.
रूग्णकल्याण निधीचा पैसे सीएसकडे
वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया रूग्णांकडून ओपीडीच्या वेळी घेण्यात येणारा पैसा जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या खात्यात जात असल्यामुळे त्या पैशाचा वापर औषधांसाठी करता येत नाही. हॉपकिन्सकडून औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा आहे.
२ कोटी ८० लाखाचे बिल थकीत
सन २०१६ पासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांसाठी खरेदी करण्यात आलेल्या औषधांचे २ कोटी ८९ लाख रूपयाचे औषधांचे बिल थकीत आहेत. निधी अभावी हे बिल निघाले नाही. शासनाने हे बिल काढले नसल्यामुळे औषधांसाठी रूग्णांना मोठा भूर्दंड सहन करावा लागत आहे.
तीन वर्षापासून २५० कोटी पडून
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कुडवा येथे २५ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु मागील तीन वर्षांपासून २५० कोटी रूपये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी पडून असून आतापर्यंत बांधकामाला सुरूवात झाली नाही. पहिल्यांदा मंत्रालयातून या कामाची निविदा झाली. इंदोर येथील ए.के.ए. कन्सलटन्स कंपनीला काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी काम सुरूच केले नाही. आता पुन्हा दुसºया निविदेची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे ते २५० कोटी पडून आहेत.
हॉपकिन्सकडून औषधी आली नाही.रूग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून दररोजच्या औषधासाठी ५ हजार रूपये महात्मा फुले जीवनदायी योजनेतून वापरण्यात येत आहे. रूग्णकल्याण निधीचे पैसे जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे जात असल्याने ते पैसे औषधासाठी वापरता येत नाही.
- डॉ. पी.व्ही. रूखमोडे
वैद्यकीय अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.