११ शौकिनांना दिला पोलिसांनी दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:22 PM2019-06-16T21:22:35+5:302019-06-16T21:23:17+5:30

सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती.

11 police gave to Shukin | ११ शौकिनांना दिला पोलिसांनी दणका

११ शौकिनांना दिला पोलिसांनी दणका

Next
ठळक मुद्देसूर्याटोला मैदानात जमली होती मैफल : ‘लोकमत’च्या वृत्तावर रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी केलेल्या कारवाईने परिसरातील नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास घेतला आहे.
रावजीभाई समाजवाडी समोरील मैदानात मुले खेळतात. तर वयस्क व वृद्ध सकाळी-सायंकाळी पायी फिरतात. जेवण झाल्यावर काही जण या मैदानात शतपावली करायचे. मात्र या मैदानावर आता दारूड्यांचे टोळके बसून दारू पित असतात. दारू पिवून शिवीगाळ व आरडाओरड करण्यासारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांना आता मैदानात जाणे कठीण झाले आहे. रात्री ८.३० वाजतानंतर रस्ताने वाहतूक कमी होताच दारुडे मैदानात आपला तळ ठोकून दारू पित बसतात. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते व त्यांनी रामनगर पोलिसांत तक्रारही दिली होती. मात्र त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.
अखेर ‘लोकमत’ने हा प्रकार बातमीच्या माध्यमातून मैदानात सुरू असलेल्या दारूड्यांचा पराक्रम उघडकीस आणला.
‘लोकमत’च्या या बातमीची दखल घेत रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुजीत चव्हाण यांनी डी.बी.पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवने, हवलदार बनकर, नाईक, माने, शिपाई केदार, बडवाईक यांनी मैदानावर धाड घालून अस्तावस्त मोटारसायकल सोडून टोळक्या टोळक्याने बसलेल्या एकूण ११ तरुणांना पकडून विचारपूस केली. त्यांचा हेतू आपले आंबट शौक भागविणे, मित्रांसोबत दंगामस्ती करणे असा असल्याचे पोलिसांना लक्षात आले तसेच त्यांनी पोलिसांशी देखील असभ्य वर्तन केल्याने पोलिसांनी त्यापैकी सौरभ विजय गजभिये (२१), अभिषेक महेंद्र लांजेवार (२३), मंगेश ताराचंद राऊत (३०), रजत सत्यजित जांगळे (२५), नोयल अंथेनी सायमन (१७, सर्व रा. रामनगर), अनुज गणेश वासनिक (२७,रा. कुंभारे नगर, पंचशील वॉर्ड) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ प्रमाणे कारवाई केली.
तसेच मैदानात विनाकारण घुटमळत असलेले तरुण नामे मोहम्मद बशीर अली (३३), मिर्झा अकबर शेख (३८), मोहसीन ईस्माईल खान (२८,सर्व रा. रामनगर), कमलेश रमेश वासनिक (२८,रा. सूर्याटोला) व अक्षय श्रावण झाडे (२४, रा. भंडारा) यांना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम १४९ प्रमाणे नोटीस दिली आहे.

नागरिकांनी मानले ‘लोकमत’चे आभार
‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात सुरू असलेला प्रकार उघडकीस आणला. शिवाय पोलिसांनी त्यावर कारवाई करीत ११ जणांना दणका दिल्याने मैदानात दारू पिवून गोंधळ घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी कमी झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांच्या त्रासाला लक्षात घेत आता ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे ठाणेदार चव्हाण यांनी सांगीतले.

Web Title: 11 police gave to Shukin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.