गोंदिया आगाराने केले ११ गाड्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:44 AM2019-02-09T00:44:48+5:302019-02-09T00:45:16+5:30
कचारगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराने ११ गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या यात्रेकरूना सालेकसा व आमगाव येथून थेट कचारगडसाठी प्रवासाची सुविधा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कचारगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराने ११ गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या यात्रेकरूना सालेकसा व आमगाव येथून थेट कचारगडसाठी प्रवासाची सुविधा देणार आहेत. १७ ते २२ या कालावधीत यात्रेकरूंसाठी ही सुविधा राहणार असून गरज पडल्यास गाड्यांत वाढ करण्याचीही आगाराची तयारी आहे.
सालेकसा तालुक्यातील कचारगड येथील गुफेत आदिवासी समाजाचे दैवत स्थापीत आहेत. पारी कुपार लिंगो जंगो काली कंकाली मातेचे हे स्थान असून दरवर्षी १७ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत कचारगड येथे यात्रा भरते.
या यात्रेत अवघ्या देशातीलच आदिवासीबांधव आद्य देवतेच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख आदिवासीबांधव कचारगड यात्रेत सहभागी होतात. कचारगड हे स्थान सालेकसा तालुका स्थळापासून १३ किमी. अंतरावर आहे. त्यातही दूरवरून येणारे भाविक रेल्वेने येत असल्याने गोंदिया आगाराने आमगाव व सालेकसा रेल्वे स्थानकावरून त्यांना थेट कचारगड जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी गोंदिया आगाराने ११ बसेसचे नियोजन केले असून यात्रेकरून रेल्वे स्थानकावरून थेट कचारगड नेणार आहेत.
विशेष म्हणजे, वर्षातून एकदा भरणाºया या यात्रेत सुमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे गोंदिया आगाराने गरज पडल्यास बसेसच्या संख्येत वाढ करण्याची तयारी ठेवली आहे.
वाहतूक नियंत्रकांची ड्युटी
यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी आगाराकडून रेल्वे व बस स्थानकावर वाहतूक नियंत्रकांची ड्यूटी लावली जाणार आहे. हे वाहतूक नियंत्रक वर्दळ बघून त्यादृष्टीने बसेसचे नियोजन करतील. अशात गरज पडल्यास विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी असलेल्या मानव विकासच्या बसेसची मदत घेतली जाणार आहे. यासाठी आगाराकडून विद्यार्थ्यांना सोडून दिल्यावर मानव विकासच्या बसेस यात्रेत वापरण्यासाठीचे नियोजन केले आहे.