पोलिस असल्याचे सांगून ११ हजार उकळले; 'गुगल पे'ने लागला छडा

By नरेश रहिले | Published: September 26, 2023 03:13 PM2023-09-26T15:13:28+5:302023-09-26T15:16:05+5:30

सरांडी बसस्थानकावरील घटना: गुगलपे ने पैसे घेतल्याने आरोपींचा त्वरीत लागला सुगावा

11,000 fraud by pretending to be police; As the money was taken by Google Pay, the accused were quickly traced | पोलिस असल्याचे सांगून ११ हजार उकळले; 'गुगल पे'ने लागला छडा

पोलिस असल्याचे सांगून ११ हजार उकळले; 'गुगल पे'ने लागला छडा

googlenewsNext

गोंदिया : बजरंग दल आणि पोलिस असल्याचे नाव सांगून शेतकऱ्यांकडून ११ हजार रूपये उकळणाऱ्या चौघांवर तिरोडा पोलिसांत दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. या घटनेसंदर्भात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी गोंदियातील असल्याचे समजते.

जनावरांना कत्तलखाण्यात नेण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत असल्याने आता शेतकरीही शेती कामासाठी जनावरे नेत असल्यास त्यांनाही धमकविण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात सुरू झाला आहे. आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत आणि पोलीस आहोत असे सांगून घाटकुरोडा येथील शेतकऱ्याला तब्बल ११ हजाराने लुटणाऱ्या चौघांवर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा येथील निशिद रूपचंद विठोले (२२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी शेती कामासाठी खरेदी केलेले बैल पिकअप क्रमांक एम एच ४९ डी ३८०७ या वाहनावर ठेवून निशिद रूपचंद विठोले (२२), अनिरूद्ध कांबळी (२३), नकूल विठोले (२०) तिन्ही रा. घाटकुरोडा व नयनित मरघडे (२१) रा. बयवाडा हे चौघेही पिकअप वाहनावर बसून बैलांना घेऊन ते घाटकोरोडा येथे जात असताना सरांडी बस स्थानकावर २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास स्कार्पिओ एम.एच. २४ ए.सी. ६००० ला त्यांच्या वाहनासमोर आडवी करून त्यांचे वाहन अडविले.

तुमच्याजवळ गाडीत असलेल्या बैलांचा परवाना आहे, का असे बोलून बैल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या आरोपींनी धमकावले. त्याच स्कार्पिओ मधील दोन आरोपीं पिकपमध्ये बसू त्यांना धमकाविणे सुरू केले. त्यांच्या खिशात असलेले ६ हजार रूपये रोख व गुगल पे ने ४ हजार ८०० रूपये घेतले. या घटने संदर्भात तिरोडा पोलिसांनी चार अज्ञात आरोपींवर भादंविच्या कलम ३६४, ३४१, ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड करीत आहेत.

पैसे न दिल्यास निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करण्याचा होता डाव

आरोपींनी पिकअप वाहनात बसल्यावर त्या वाहनाच्या खिडक्या बंद करून त्यांना धमकाविले. त्या शेतकऱ्यांच्या चारही मुलांना निर्जन ठिकाणी घेऊन जाण्याचा त्यांना बेदम मारहाण करण्याचा त्यांचा माणस होता.

गुगल पोहचविल लुटारूंपर्यंत

शेतकऱ्याच्या मुलांना लुटणारे चौघेही आरोपी २५ ते ३० वर्ष वयोगटातील आहेत. त्यांनी ६ हजार रूपये रोख घेतल्यावरही ४ हजार ८०० रूपये गुगल पे ने घेतले. हा गुगल या चारही आरोपींपर्यंत पोहचविणार आहेत. याच आधारावर लुटणारे दोघे गोंदियातील असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपींना अजूनपर्यंत अटक झाली नाही. पोलीसांचे शोधकार्य सुरू आहे.

काटी येथील बाजारातून घेतली होती ४० हजारात जोडी

घाटकुरोडा येथील शेतकऱ्यांनी गोंदिया तालुक्याच्या काटी बाजारातून ४० हजार रुपये किंमतीत एक बैल जोडी खरेदी केली होती. त्या बैल जोडीला पिकअप क्रमांक एम एच ४९ डी ३८०७ या वाहनावर ठेवून ते काटी बाजारातून घाटकुरोडा येथे जात असताना सरांडी बस स्थानकावर रात्री १० वाजताच्या सुमारास पकडले. तब्बल ४५ मिनीटे आरोपींनी त्यांना तुमच्याजवळ गाडीत असलेल्या बैलांचा परवाना आहे का असे, धमकावून लुटले.

Web Title: 11,000 fraud by pretending to be police; As the money was taken by Google Pay, the accused were quickly traced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.