११२ गावांनी कोराेनाला वेशीवरच रोखले ! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:29 AM2021-04-08T04:29:48+5:302021-04-08T04:29:48+5:30

गोंदिया : कोराेना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत ...

112 villages block Corana at the gate! (Dummy) | ११२ गावांनी कोराेनाला वेशीवरच रोखले ! (डमी)

११२ गावांनी कोराेनाला वेशीवरच रोखले ! (डमी)

Next

गोंदिया : कोराेना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. जिल्ह्यातील २ शहरांसोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील एकूण ९३१ गावांपैकी ८१९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यातील ४४९ गावांमध्ये अजूनही रूग्ण क्रियाशील आहेत, तर ११२ गावांत अजूनही कोरोनाने पाय ठेवला नाही. ग्रामीण भागातील लोकांच्या सतर्कतेमुळे ११२ गावांत वेशीवरच कोरोनाला रोखण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

कोरोना स्वत:हून येत नाही तर कोरोनाला आणायला जाऊ नका, असा संदेश ग्रामीण भागात देण्यात आल्याने आजही ११२ गावांपर्यंत कोरोना पोहोचू शकला नाही. गावकऱ्यांकडून गावात कोरोना रोखण्यासाठी समित्या तयार करण्यात आल्या. त्या समित्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवून कोरोनाला वेशीबाहेर थांबविण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आता महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हा उपक्रम आणून कोरोनासंदर्भात जनजागृती केली. शारीरिक अंतर ठेवून तोंडाचा मास्क खाली उतरू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले.

..........

सद्यस्थितीत रुग्ण-२३८६

शहरी रुग्ण-१४८६

ग्रामीण रुग्ण- ९००

कोरोनावर मात-१५६३२

एकूण मृत्यू-२०२

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण- २७ मार्च २०२०

जिल्ह्यात एकूण गावे-९३१

गावांत कोरोनाचा रुग्ण नाही-११२

......

आधी रुग्ण आढळला पण सद्या शुन्यावर

गोंदिया जिल्ह्यातील ३७० गावांत यापूर्वी रूग्ण आढळले होते. परंतु आता ही गावे शुन्यावर आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांचे तेवढे उपक्रम सुरू नाहीत, तर आपली काळजी आपणच घेण्याची जनजागृती आता होत आहे.

........

कोट

कोरोनावर औषध नसल्याने लोकांनी सुरुवातीपासून काळजी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या उपक्रमाला उत्कृष्टपणे राबिवले. याची ही फलश्रुती आहेे. आपल्या गावात कोरोना येऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी काळजी घेतली. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात कीटकनाशक फवारणी केली. गावकऱ्यांना साबणाचे वाटप करून जनजागृती करण्यात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अग्रेसर राहिले.

रोशनी राजकुमार भुते, सरपंच, शिलापूर

...........

प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून मास्क वितरण करण्यात आले. सुरुवातीला गावातील सीमा सील केल्या होत्या. मोठ्या शहरातून किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तिंसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये अलगीकरण, विलगीकरण कक्ष तयार केले होते. बाहेरून येणाऱ्यांना गावाबाहेर राहण्याची सोय केली होती. सोबतच त्यांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून केली.

- लीलेश्वर खुने, सरपंच, संभलपूर

.......

सुरूवातीपासून माहिती न देणाऱ्याला दंड ठोठावण्यात आला. आधी माहिती द्या, अशी जागृती गावात दवंडी देऊन करण्यात आली. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर दिला.

मार्कंड बडवाईक, उपसरपंच, बिटटोला

Web Title: 112 villages block Corana at the gate! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.