११६ वयोवृद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 02:01 AM2017-01-11T02:01:42+5:302017-01-11T02:01:42+5:30

स्व. पंढरीबापू घाटबांधे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवक संघटना कनेरी-केशोरीच्या सौजन्याने तीन दिवसीय रात्रकालीन प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

116 Honors of Veterans | ११६ वयोवृद्धांचा सत्कार

११६ वयोवृद्धांचा सत्कार

Next

केशोरी : स्व. पंढरीबापू घाटबांधे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवक संघटना कनेरी-केशोरीच्या सौजन्याने तीन दिवसीय रात्रकालीन प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन नारायणभाऊ घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेदार कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोपीय सोहळ्यात केशोरी व परिसरातील ११६ वयोवृध्दांचा ब्लॉकेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अश्विनी भालाधरे, उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, मुख्याध्यापक शालीक कोरे, वासुदेव मडावी, धनराज पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते. वीर बिरसा मुंडा व स्व. पंढरीबापू घाटबांधे यांच्या प्रतिमेचे पूजन कबड्डी सामन्यांची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. राधाकृष्णन कॉन्व्हेंटचे एक दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी एकलनृत्य, सामूहिक नृत्य, जोडी नृत्यांची अदाकारी, कौशल्य दाखविले. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजरात त्यांचा जोष वाढविण्याचा प्रयत्न करून साद दिली.
यावेळी घाटबांधे फाऊंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमधून दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉ.पिकू मंडल होते. अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष नारायण घाटबांधे, मुख्याध्यापक शालीक कोरे, सचिन फटींग, शामदेव रेहपाडे, सरपंच अश्विनी भालाधरे, उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, डॉ. प्रमोद भिवापुरे, योगेश नाकाडे, आनंदराव घाटबांधे, रेवराम तिडके, विनोद गहाणे, माधुरी गहाणे, मुख्याध्यापक पेशने, पी.के. लोथे, कापगते उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते रात्रकालीन प्रौढ कबड्डी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या संघाला रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. ज्या वयोवृध्दांचा सत्कार करण्यात आला, त्यांच्यासाठी सामूहिक मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील सर्वच आबालवृध्दांनी घेतला.
प्रास्ताविकातून ग्रा.पं. सदस्य तथा युवा संघटना अध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी केले. त्यांनी पंढरीबापू घाटबांधे यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला. संचालन अनिल लाडे यांनी केले तर आभार लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवक संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: 116 Honors of Veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.