जिल्ह्यात ११८ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:23 AM2017-07-19T00:23:29+5:302017-07-19T00:23:29+5:30

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यातील निकषामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया रखडली होती.

118 crore crop loan allocated in the district | जिल्ह्यात ११८ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप

जिल्ह्यात ११८ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप

Next

केवळ ६५ शेतकऱ्यांनी केली अग्रीम रकमेची उचल
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यातील निकषामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया रखडली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पीक कर्ज वाटपाला गती आली असून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील २७ हजार शेतकऱ्यांना ११८ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले.
कर्जमाफीचे आदेश बँकापर्यंत पोहचण्यास विलंब झाल्याने सुरूवातीला पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू होते. पण, मागील पंधरा दिवसांपासून यातील अडचणी दूर झाल्यानंतर पीक कर्ज वाटपाला गती आली. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकापेक्षा जिल्हा बँकेतून कर्जाची उचल करणे सोयीचे वाटत असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आतापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ४३२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेतून ४ हजार ७५ शेतकऱ्यांनी ३० कोटी ५० लाख रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी एकूण ११८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. तर आत्तापर्यंत २७ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याने पीक कर्जाची उचल न करणारे शेतकरी स्वत:हुन पीक विमा काढत नसल्याचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आहे.

पीक विमा लागू करा
शासनाने काही जिल्ह्यात सुरू केलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा शेतकऱ्यां्ना चांगला लाभ मिळत आहे. पण, ही योजना काही मोजक्याच पिकांसाठी लागू आहे. ही योजना सरसकट सर्वच पिकांसाठी लागू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. पिक विम्याचा जोखीमस्तर वाढविण्याची गरज असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.
 

Web Title: 118 crore crop loan allocated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.