बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By नरेश रहिले | Published: December 17, 2023 04:56 PM2023-12-17T16:56:12+5:302023-12-17T16:56:29+5:30

मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

12 bikes with fake numbers hidden, seized before sale Action by local crime branch | बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोंदिया : मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १६ डिसेंबर रोजी करण्यात आली आहेत. राहुल ऊर्फ चंगा सुखचांद लिल्हारे (२१) रा. अंगुर बगिचा गोंदिया याला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथे अटक केली आहे. त्याने तिरोडा तालुक्यातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आल्याने त्याला तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे निर्देश दिलेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना १६ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा येथील दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल चोरणारा आरोपी राहुल ऊर्फ चंगा लिल्हारे रा. अंगुर बगीचा गोंदिया हा असल्याचे समजताच त्याची मािहती काढून भंडारा जिल्ह्याच्या बाम्हणी येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने १२ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकलींची किंमत ४ लाख ८८ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, तिरोडाचे पोलीस निरीक्षक, देविदास कठाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडे, पोलीस हवालदार दिपक खांडेकर, पोलीस शिपाई शैलेश दमाहे यांनी केली आहे.
 
तीन जिल्ह्यातून दुचाकी केल्या चोरी
मोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नागपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यातून त्याने मोटार सायकली चोरलेल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकल तो वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवत होता. या चोरी केलेल्या दुचाकी काही विना क्रमांकाच्या तर काहींना नंबरच नसल्याचे लक्षात आले.

Web Title: 12 bikes with fake numbers hidden, seized before sale Action by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.