विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर १२ गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:06+5:302021-05-06T04:31:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हाभरातील पोलिसांनी ४ मे रोजी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. रावणवाडीच्या त्रिमूर्ती चौकात ४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हाभरातील पोलिसांनी ४ मे रोजी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. रावणवाडीच्या त्रिमूर्ती चौकात ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजता विनाकारण फिरणाऱ्यांवर नायक पोलीस शिपाई शेखर पटले यांच्या तक्रारीवरुन रावणवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९,२७०, सहकलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी व तिसरी कारवाई दुपारी १२ वाजता त्रिमूर्ती चौकात करण्यात आली. तिसरी कारवाई पोलीस शिपाई श्रीकांत नागपुरे यांनी केली. चौथी व पाचवी कारवाई पंचशील चौक देवरी येथे ४ मे रोजी रात्री ८.४५ वाजता करण्यात आली. तोंडावर मास्क न लावता एकजण विनाकारण रस्त्याने फिरत होता. पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १८८, २६९, २७०, सहकलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सहकलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहावी व सातवी कारवाई गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनोहर चौकात ४ मे रोजी दुपारी १२.२० वाजता सहाय्यक फौजदार संतोष माेरघडे यांनी केली. आठवी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा नाका येथे सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान पोलीस हवालदार राजेश भुरे यांनी केली आहे. नववी व दहावी कारवाई रावणवाडी पोलिसांनी काटी येथे केली. सकाळी ११.३० वाजता विनाकारण बोहर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई विक्की दगडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. अकरावा व बारावा गुन्हा गंगाझरी पोलिसांनी दाखल केला आहे. मुंडीपार व भानपूर येथे सायंकाळी ६.३० वाजता विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांनी गुन्हा दाखल केला. संबंधित पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९, २७०, सहकलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सहकलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.