इर्री ग्रामपंचायतला १२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:57 PM2018-07-24T23:57:51+5:302018-07-24T23:58:24+5:30

रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर, दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आदेश १६ जुलै रोजी काढले आहेत.

12 lakh penalty for Irri gram panchayat | इर्री ग्रामपंचायतला १२ लाखांचा दंड

इर्री ग्रामपंचायतला १२ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देनामंजूर गटात मुरूम खोदले : दंड त्वरीत भरण्याचे काढले आदेश

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर, दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आदेश १६ जुलै रोजी काढले आहेत.
ग्राम इर्री येथे पांदन रस्त्यासाठी लागणारे मुरूम गट क्रमांक ९४८ आराजी ४ हेआर पैकी १ हेआर जागेतून काढण्याची मंजुरी तहसीलदारांनी दिली होती. मंजुरी देण्यात आलेल्या या गटातून २८० ब्रास मुरूम काढायचे होते. त्यासाठी एक लाख ३५ हजार १६० रूपयांची रॉयल्टी ग्रामपंचायतमार्फत भरण्यात आली होती. परिणामी, त्या बाबत ७ जून २०१६ रोजी ग्रामपंचायतला आदेश देण्यात आले होते. परंतु, तहसीलदारांनी मंजुरी दिलेल्या गट क्रमांक ९४८ मधून मुरूम खोदकाम न करता मंजुरी नसलेल्या गट क्रमांक ५४३ आराजी ८.४९ हेआर या तलावाच्या जागेतून मुरूमाचे खोदकाम करण्यात आले. घडलेल्या प्रकारावर आक्षेप घेत सहेसराम श्रीराम उपवंशी यांनी १५ डिसेंबर २०१७ रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यासंदर्भात ग्राम कामठा येथील मंडळ अधिकारी ए.आर.कोरे यानी चौकशी करून अहवाल सादर केला होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या मौका चौकशीत गट क्रमांक ९४८ आराजी ४ असून पहाडी मलमा आहे. त्या ठिकाणी कुठलेही खोदकाम नाही. परंतु, गट क्रमांक ५४३ ची मंजुरी नसताना या तलावातून खोदकाम करण्यात आल्याचे त्यांनी चौकशी अहवालात नमूद केले.
याप्रकरणी २३ मार्च २०१८ रोजी ग्राम इर्रीच्या सरपंच दुर्गा लखनलाल मेंढे व ग्रामसेवक व्ही.आर.मसराम यांची सुनावणी झाली व त्यात त्यांनीही कबुली दिली होती. परिणामी, २८० ब्राम मुरूमाचे बाजार मुल्य सिएसअर प्रमाणे २८५ घनमीटर मुल्यानुसार दंड आकारण्यात आला आहे.
२८० ब्रास मुरूमाचे खोदकाम
ग्राम इर्री येथील अवैध मुरूम खोदकाम प्रकरणी गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार सी.आर.भंडारी यांनी प्रकरणी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच मुरूमाचे बाजारमुल्य सिएसआर प्रमाणे प्रती घनमीटरच्या दराने प्रती ब्रास ८०३.७० पैसे नुसार पाच पट दंडाची रक्कम ११ लाख २५ हजार १८० रूपये तसेच दंड-स्वामीत्वधन एक लाख १२ हजार रूपये आणि भुपृष्ठ भाडे सहा हजार ५०० रूपये असा एकूण १२ लाख लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सरपंचाने खोदकाम केल्याची ग्रामसेवकाची कबुली
प्रकरणी ग्राम इर्रीचे ग्रामसेवक व्ही.आर.मसराम यांची सुनावणी झाली. सुनावणीत मसराम यांनी सदर अवैध खोदकाम सरपंचांनी केल्याची कबुली दिली. मंजुरी नसलेल्या गट क्रमांक ५४३ मधून सरपंचांनी खोदकाम केल्याचे मसराम यांनी तहसीलदारांसमक्ष सुनावणीत सांगीतले.

Web Title: 12 lakh penalty for Irri gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.