क्रिप्टो करंसीतील गुंतवणुकीतून १२ लाखांचा गंडा

By कपिल केकत | Published: August 5, 2023 04:42 PM2023-08-05T16:42:49+5:302023-08-05T16:44:34+5:30

शिक्षकालाही लावला चुना : अन्य काही गुंतवणूकदारांचाही समावेश

12 lakhs from investment in crypto currency | क्रिप्टो करंसीतील गुंतवणुकीतून १२ लाखांचा गंडा

क्रिप्टो करंसीतील गुंतवणुकीतून १२ लाखांचा गंडा

googlenewsNext

गोंदिया : क्रिप्टो करंसीतील गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष देऊन भामट्याने शिक्षकासह अन्य काहींना तब्बल १२ लाख रुपयांचा गंडा घातला. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ८ जुलैपासून हा प्रकार सुरू होता.

फिर्यादी प्राथमिक शिक्षक अभय सूरजलाल बिसेन (३४,रा.गोरेगाव) यांच्यासह अन्य काही जणांना आरोपी सुखदेव छब्बू उघडे याने क्सासिक कॅपिटल फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये (क्रिप्टो करंसी) ऑनलाइन गुंतवणूक करून दिवसाला त्यावर २ ते ५ टक्के नफा देण्याचे आमिष दिले. यानंतर सर्वांकडून एकूण १२ लाख रुपयांची गुंतवणूक करवून घेतली व त्यानंतर त्यावरील नफा देण्यास नकार देऊन १२ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४२० सहकलम ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 12 lakhs from investment in crypto currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.