स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्या १२ मोटारसायकल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:22+5:302021-07-24T04:18:22+5:30
गोंदिया : शहर व जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मोटारसायकल चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर ...
गोंदिया : शहर व जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मोटारसायकल चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर होती व स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी १२ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई गुरूवारी (दि. २२) सायंकाळी करण्यात आली. प्रशांत कन्हैयालाल कोहळे (३२, रा. एमआयडीसी, मुंडीपार) व निशांत उर्फ विक्की सुनील खरोले (२४, रा. सेजगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रशांत कोहळे याच्याजवळ चोरीची मोटारसायकल असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावर त्याला विचारपूस केल्यावर त्याने निशांत उर्फ विक्की सुनील खरोले (२४) याच्यासोबत येथील बाई गंगाबाई रुग्णालयाच्या मागील भागातून त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी निशांतला आणि प्रशांतला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्या दोघांकडून १२ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ४ लाख ४० हजार रूपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, रेखलाल गौतम, विजय मानकर, संतोष केदार, पंकज खरवडे यांनी केली आहे. या आरोपींवर भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
......................
या क्रमांकाच्या मोटारसायकल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या मोटारसायकलमध्ये एमएच ३५- क्यू ६६४४, एमएच ३५- एक्स ५६६२, एमएच ३६-आर ५०२२, एमएच ३१-सीजे ५८३७, एमएच ३१-ईएच २०४२, एमएच ३५- एडी ८३७७, एमएच ३६-क्यू ६४३५, एमएच ३६-क्यू ६४३५, एमएच ३६-क्यू ७२२७, एमएच ३६-आर १७८५ यांच्यासह दोन विनाक्रमांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.