१२ गावातील शेतकऱ्यांचा लोकार्पणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:16 PM2018-12-31T22:16:58+5:302018-12-31T22:17:32+5:30

इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.

12 Resistance to farmers' homosexuality | १२ गावातील शेतकऱ्यांचा लोकार्पणाला विरोध

१२ गावातील शेतकऱ्यांचा लोकार्पणाला विरोध

Next
ठळक मुद्देझाशीनगर उपसा सिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार आहे.
झाशीनगर उपसा सिंचन योजना ही येरंडी, जब्बारटोला, पवनी, कोहलगाव,धाबेटेकडी, जांभळी, चुटिया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपुरी या १२ आदिवासी गावातील २५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या मुळ हेतूने तयार करण्यात आली. या योजनेद्वारे २५.३३ दलघमी पाण्यचा उपसा करुन सिंचन केले जाणार आहे. यावर्षी इटियाडोह धरणातील २५ दलघमी पाणी याकामी राखीव करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुख्य कालवा व उपकालव्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परंतु झाशीनगर उपसा सिंचन विस्तारित योजनेद्वारे नवेगाव जलाशयात पाणी सोडून लोकार्पणाची घाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वीच राष्टÑवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, राकाँचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी या कार्यक्रमाचा पत्रकार परिषदेतून विरोध केला होता.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा १ च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन २९ डिसेंबरला केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व उद्घाटक म्हणून जलसंपदा जलसंधारण आणि सांसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे हे राहणार होते. पाटबंधारे महामंडळातर्फे लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. हा लोकार्पण सोहळा येरंडी दर्रे या गावात होत असला तरी याची माहिती या योजनेच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांना नव्हती हे विशेष. वर्तमानपत्रातून जेव्हा या सोहळ्याची प्रसिद्धी झाली तेव्हा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले. कामे अपूर्ण व सिंचनाने शेतीला पाणी उपलब्ध होत नसतांना हा लोकार्पण सोहळा गुप्तपणे कसा पार पडला जात आहे. म्हणून शेतकरी अवाक राहिले. उद्दिग्न असलेले आदिवासी शेतकरी या कार्यक्रमाचा विरोध दर्शविण्यासाठी झाशीनगर येथून ट्रॅक्टरने लोकार्पणस्थळी एकत्र आले. मात्र या कार्यक्रमात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक? हा सोहळाच रद्द झाला. विरोध करण्यासाठी गोळा झालेले आदिवासी शेतकरी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकून आनंदाने गावाकडे परतले.
टप्पा १ अंतर्गत लाभधारक क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना जोपर्यंत सिंचनाचा लाभ मिळत नाही. तोपर्यंत टप्पा २ चे लोकार्पण होऊ देणार नाही. अशा घोषणा शेतकऱ्यांनी केल्या. या वेळी श्यामराव ठवरे, पं.स.सदस्य प्रेमलाल गेडाम, बळीराम कारंगे, ताराचंद ठवरे, भिमराव नंदेश्वर, विक्की अरोरा व १२ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: 12 Resistance to farmers' homosexuality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.