जि.प.शाळेतील पहिल्या वर्गात १२१९४ ऑनलाईन प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:27+5:30
जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ उपक्रम राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे या शाळांची पटसंख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. गुढीपाडवापासून सुरू करण्यात आलेली ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १ मे पासून सुरू करण्यात आली. १२ मे पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीच १२ हजार १९४ प्रवेश निश्चीत झाले आहे.
जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ उपक्रम राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे या शाळांची पटसंख्या वाढली आहे. आणखी जि.प. शाळांतील विद्यार्थी संख्या घटू नये यासाठी यंदापासून वर्ग पहिलीत ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत आमगाव तालुक्यात ९६०,सालेकसा ७५८, देवरी १ हजार ११४, सडक-अर्जुनी १ हजार १०९, अर्जुनी-मोरगाव १ हजार २४०, गोरेगाव १ हजार ४१८, तिरोडा १ हजार ८३१ व गोंदिया तालुक्यात ३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, उपस्थिती भत्ता, प्रशिक्षित शिक्षक, हँडवॉश स्टेशन, बालग्रंथालय, वाचन कुटी इत्यादी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याच गावातील नाहीतर बाहेर गावातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घ्यायला येतात. सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांमध्ये होत आहे. जिल्ह्यातील हजारो शिक्षक संगणक प्रशिक्षणामुळे तंत्रस्नेही झाले आहेत. प्रत्येक शाळेत डिजीटल साधन असून त्याचा नियमित वापर करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने (महाराष्ट्र शासन) दिक्षा अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन अभ्यासक्र म शिकविले जाते. यातूनच आता १ मेपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
मे महिना प्रवेशासाठी
जि.प.शाळांमध्ये प्रवेश वाढविण्याकरिता दरवर्षी ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून १०० टक्के प्रवेशासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्र माला स्थगिती देण्यात आली आहे. शाळेतील प्रवेश प्रक्रि या १ मेपासून ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण मे महिन्यात ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे.
गोंदिया शिक्षण विभागाने लिंक तयार करून ऑनलाईन प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करून प्रवेश निश्चित करून घ्यावा. आपापल्या शाळेत प्रवेश वाढविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.